Who Is Venkata Datta Sai?: कोण आहे वेंकट दत्ता साई? दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूसोबत अडकणार लग्नबंधणार
पीव्ही सिंधूच्या घरी लगीनघाई सुरू आहे. पण दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूच्या जोडीदाराबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. कोण आहे वेंकट दत्ता साई? कोणत्या क्षेत्रात काम करतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या पीव्ही सिंधूच्या चाहत्यांना जाणून घ्यायची आहेत.
Who Is Venkata Datta Sai?: दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू 22 डिसेंबर रोजी आयुष्यातील नवा प्रवास सुरू करणार(PV Sindhu Fiance) आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांना तिच्या लग्नाबाबत तिने ही आनंदाची बातमी दिली. वेंकट दत्ता साई ( Venkata Datta Sai)यांच्यासोबत पीव्ही सिंधू 22 डिसेंबर रोजी लग्नबंधणात अडकणार आहे. 20 डिसेंबरपासून तिच्या लग्नाचे विधी सुरू होतील. 24 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, पीव्ही सिंधूच्या लग्नाबाबातची उत्सुकता जगभरातील चाहत्यांना लागली आहे. सगळेच तिच्या जोडीदाराबाबत माहिती मिळवण्याचा (Who is PV Sindhu Fiance?)प्रयत्न करत आहे. (हेही वाचा:PV Sindhu Wedding: पीव्ही सिंधू लवकरच अडकणार विवाह बंधनात, 22 डिसेंबरला होणार विवाह सोहळा)
वेंकट दत्ता साई कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे तर वेंकट दत्ता साई हे उदयपूर येथे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, पीव्ही सिंधूच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबे एकमेकांना ओळखत होती, परंतु लग्न एक महिन्यापूर्वीच ठरले होते. जानेवारीपासून त्यांचे वेळापत्रक खूप व्यस्त असल्याने लग्नाची वेळ डिसेंबरमध्येच ठेवण्यात आली."(हेही वाचा: Commonwealth Games 2022: PV Sindhu ला Badminton Women's Singles मध्ये सुवर्णपदक; Michelle Li वर मात)
पीव्ही सिंधूच्या घरी लगीनघाई
कोण आहे व्यंकट दत्ता साई?
वेंकट दत्ता साई यांनी फाऊंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशनमधून लिबरल स्टडीजमध्ये डिप्लोमा केला आहे. 2018 मध्येत्यांनी फ्लेम युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमधून बीबीए अकाऊंटिंग आणि फायनान्स पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. वेंकट दत्ता साई यांनी जेएसडब्ल्यू सह समर इंटर्न तसेच इन-हाउस सल्लागार म्हणून काम केले.
पीव्ही सिंधूची आत्तापर्यंतची कारकीर्द
आत्तापर्यंत पीव्ही सिंधूची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. सिंधूने पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले आहे. 2019 मध्ये सुवर्णपदकआपल्या नावे नोंदवले. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. सिंधू या महान बॅडमिंटनपटूने रिओ आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यात यश मिळवले होते. 2017 मध्ये सिंधूने तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग मिळवली. जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळवून इतिहास रचला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)