विराट कोहली याच्या भारतीय संघातील Lucky Charm प्लेअर कोण?
नक्की कोणता खेळाडू विराटसाठी खास असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ऑस्ट्रेलियामधील कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने न्युझिलंडमध्ये ही दणदणीत विजय मिळवा आहे. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये सोमवारी (28 जानेवारी) माऊंट मॉनगनुआ येथील बे ओव्हल मैदानावर तिसरा सामना जिंकत भारतीय संघाने 3-0 असे वर्चस्व मिळवले आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला त्यांच्याच मायदेशात भारतीय संघाने नतमस्तक केले आहे.
येत्या 2019 मधील आयसीसी वर्ल्ड कप (ICC World Cup 2019) साठी भारतीय संघाकडून सकारात्मक भूमिका दिसून येत आहे. तसेच खेळाडूंची निवडप्रक्रियेसाठी भारतीय संघाला कसरत करावी लागली. तरीही निवडलेल्या खेळाडूंनकडून उत्तम कामगिरी केली जाईल अशी अपेक्षा आहे.(हेही वाचा-India Vs New Zealand 3rd ODI: भारताचा न्युझीलंडवर 7 विकेट्सनी दणदणीत विजय, मालिकेत 3-0 चं वर्चस्व)
मात्र भारतीय संघाच्या कॅप्टन कुल विराट कोहली (Virat Kohli) साठी संघातील एक असा प्लेअर आहे की जो त्याच्यासाठी लकी चार्म ठरत आहे. नक्की कोणता प्लेअर विराटसाठी खास असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तर मध्यमगती फलंदाज (middle-order batter) केदार जाधव (Kedar Jadhav) हा विराट कोहलीचा लकी चार्म (Lucky Charm) असल्याचे म्हटले जात आहे. केदार जाधव ह्याने भारतीय संघातून 2017 मध्ये न्युझिलंड विरुद्धचा सामना, पुणे एकदिवसीय सामना असे एकूण 16 एकदिवसीय सामने खेळला आहे.
भारतीय संघाचा या 16 पैकी एकही एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव झाला नाही. तर संघाने एक सामना सोडून उर्वरिक सामने जिंकून विजय मिळवला आहे. तर आता सर्वांचे येत्या आयसीसी वर्ल्ड कप मधील अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे. मात्र विराह कोहलीचा लकी चार्म भारत विरुद्धच्या संघावर भारी पडणार का हे सर्वांना पाहायचे आहे.