वेस्ट इंडिजचा टी-20 विश्वचषक विजेता कर्णधार डैरेन सैमी बनणार पाकिस्तानी नागरिक, देशातील सर्वात मोठ्या नागरी सन्मानाने होणार गौरव
पाकिस्तान सरकार त्यांना या सन्मानाने गौरवेल.
वेस्ट इंडीजचा (West Indies) माजी कर्णधार डॅरेन सॅमीने (Darren Sammy) आंतरराष्ट्रीय क्रिकेट देशात परत आणण्याच्या भूमिकेबद्दल त्यांना मानद नागरिकत्व देण्यात येणार असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) जाहीर केले. पाकिस्तान सरकार त्यांना या सन्मानाने गौरवेल. सैमी सध्या पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super Legue) पाचव्या सत्रात पेशावर झल्मी संघाचे नेतृत्व करीत आहे. त्याला 23 मार्च रोजी देशाचे मानद नागरिकत्व तसेच देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान, निशान-ए-हैदर (Nishan-e-Haider) या सन्मानाने गौरविण्यात येईल. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी त्यांचा हा सन्मान देऊन गौरव करतील. सैमीने पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत येण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली होती. या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परत आणण्यातही त्यांची मोठी भूमिका होती. 2017 मध्ये लाहोरमध्ये पीएसएलमध्ये जेव्हा परदेशी खेळाडूंनी सुरक्षेचा हवाला देत तेथे खेळण्यास नकार दिला होतातेव्हा सैमी खेळण्यासाठी सहमती दर्शवणारा पहिला परदेशी खेळाडू होता. लाहोरमध्ये झालेल्या दुसर्या अंतिम सामन्यात त्याने पेशावर झल्मी संघाचाचे नेतृत्व केले होते.
पाकिस्तान सुपर लीग संघ पेशावर झल्मीचे मालक जावेद आफ्रिदी म्हणाले की, सैमीने पाकिस्तान क्रिकेटसाठी जे केले त्याबद्दल त्यांना पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना मानद नागरिकत्व देण्याची विनंती केली होती. सैमी जगातील तिसरा क्रिकेटपटू होईल ज्याला एखाद्या देशाच्या सरकारने मानद नागरिकत्व दिले जाईल. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मैथ्यू हेडेन आणि दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्स यांना मानद नागरिकत्व देण्यात आले आहे. सेंट किट्स सरकारने 2007 च्या विश्वचषकानंतर त्यांना देशाचे मानद नागरिकत्व दिले.
सैमीच्या नेतृत्वात वेस्ट इंडीज टीमने दोन टी-20 विश्वचषकचे जेतेपद जिंकले आहेत. त्यांना पाकिस्तानमध्ये खूप पसंत केले जाते आणि त्यांच्या चाहत्यांची कोणतीही कमी नाही. पाकिस्तानच्या या टी-20 लीगच्या पाचही हंगामात सैमी झळकला आहे. पेशावरने त्यांच्या नेतृत्वात एक जेतेपद जिंकले आहेत. 2009 मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंका क्रिकेट टीमच्या बसवर हल्ला करण्यात आला होता, ज्यानंतर सर्व संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता.