Anushka Sharma च्या 'Zero' सिनेमावर Virat kohli ची खास प्रतिक्रीया

मात्र आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून त्याने झिरो सिनेमाचा आनंद घेतला. आता त्याला हा सिनेमा कसा वाटला? पाहा काय म्हणतोय विराट...

Anushka Sharma | Virat Kohli (photo credits: Twitter/Virat Kohli)

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही स्टार जोडी सतत कोणत्यातरी कारणावरुन चर्चेत असते. तसंच यांच्या अतूट नात्याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन वारंवार येत असतो. दोन दिवसांपूर्वीच अनुष्काचा झिरो (Zero) सिनेमा प्रदर्शित झाला. विराटने अनुष्कासोबत तो सिनेमा पाहिला. कसोटी मालिकेसाठी विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात आहे. मात्र आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून त्याने झिरो सिनेमाचा आनंद घेतला. आता त्याला हा सिनेमा कसा वाटला? याची उत्सुकता चाहत्यांना असेलच. तर विराट कोहलीने ट्विट करुन सिनेमाविषयीची प्रतिक्रीया दिली आहे. 'झिरो' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी कमाई किती?

तर पाहुया काय म्हणतोय विराट झिरो सिनेमाविषयी...

विराटने ट्विट करत म्हटले आहे की, "झिरो सिनेमा मनोरंजनाचा आनंद देतो. मी स्वतः सिनेमा खूप एन्जॉय केला. प्रत्येकाने त्यांची भूमिका अगदी चोख बजावली आहे. या सिनेमातील अनुष्काच्या सादरीकरणाच्या प्रेमात मी पडलो. मला असं वाटतं, अनुष्काची भूमिका खूप आव्हानात्मक होती आणि तिने ती अतिशय सुंदररीत्या वठवली."

विराटच्या या ट्विटवरुन अनुष्कावरील त्याचे प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. झिरो सिनेमा पाहायाला गेलेल्या विराट-अनुष्काला ऑस्ट्रेलियातील मॉलमध्ये स्पॉट करण्यात आले होते. तो व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यापूर्वी विराटने अनुष्काचा सुईधागा सिनेमा पाहिला होता. त्याचा प्रतिसादही विराटने ट्विट करत नोंदवला होता.