ICC World Cup 2019: IND vs BAN विजयानंतर विराट कोहली झाला रोहित शर्मा चा 'जबरा फॅन', म्हणाला तो सर्वोत्तम वनडे खेळाडू आहे
आणि त्याने रोहितचे भर भरून कौतुक केले आहेत.
इंग्लंड (England) मध्ये सुरु असलेल्या आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आपल्या तुफानी कामगिरीसाठी टीम इंडिया (Team India) चा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यंदाच्या विश्वकपमध्ये रोहितने 4 शतक आणि 2 अर्धशतक जडले आहे. भारताने आपले 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे आणि त्यात रोहितने मोलाची कामगिरी केली आहे. बांग्लादेश (Bangladesh) विरुद्ध मॅचमध्ये रोहितने आपले चौथे शतक ठोकले आणि विश्वकपमध्ये 500 धावा पूर्ण केल्या. रोहितच्या या तुफान कामगिरी नंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही त्याचा 'जबरा फॅन' झाला आहे. आणि त्याने रोहितचे भर भरून कौतुक केले आहेत. (टीम इंडिया च्या व्हेरी व्हेरी स्पेशल फॅनसोबत साजरा केला रोहित शर्मा आणि विराट कोहली ने IND vs BAN मॅचमधील विजय, पाहून तुम्हीसुद्धा प्रफुल्लित व्हाल View फोटो)
पोस्ट मॅच प्रस्तुतीकरणमध्ये रोहितचे कौतुक करत विराट म्हणाला, "रोहित सर्वात चांगला वनडे खेळाडू आहे आणि त्याला अशी खेळी करताना पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे. जेव्हा तो अशा प्रकारे खेळतो, तेव्हा त्याला पाहून त्यांना खूप आनंद होतो".
दरम्यान, विराटने भारताचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) चे ही कौतुक केले. "त्यांचे (बुमराह) ओव्हर नेहमीच निर्णायक असतात आणि म्हणून आम्ही चार ओव्हरनंतर त्याला आराम देतो."
"तो उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे आणि तो काय करत आहे हे ठाऊक आहे.
विश्वकपच्या साखळी फेरीत भारताचा अंतिम सामना श्रीलंका (Sri Lanka) शी 6 जुलैला होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामना हेडिंग्ले च्या मैदानात खेळाला जाईल.