एबी डिव्हिलियर्स याने स्टिव्ह स्मिथ याची राफेल नडालशी केली तुलना, म्हणाला-'विराट कोहली क्रिकेटचा रोजर फेडरर'

त्याने विराटचे वर्णन फेडरर म्हणून केले आणि स्मिथची तुलना राफेल नडालशी केली.

रोजर फेडरर आणि राफेल नडाल, विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

रोजर फेडरर (Roger Federer), टेनिस विश्वात हे एक प्रख्यात नाव आहे. 20 ग्रँड स्लॅम विजेता फेडरर मागील काही वर्षांपासून उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहे. त्याचप्रमाणे एक क्रिकेटपटू जो क्रिकेटचा फेडरर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यांची तुलना एका विशेष पद्धतीने केली आहे. त्याने विराटचे वर्णन फेडरर म्हणून केले आणि स्मिथची तुलना राफेल नडालशी (Rafael Nadal) केली. डिव्हिलियर्सने क्रिकेट समालोचक पोमी म्बान्गवासमवेत एका इन्स्टाग्राम लाईव्ह सत्रादरम्यान या दोन्ही खेळाडूंबद्दल चर्चा केली. त्याने विराटला स्मिथपेक्षा चांगला स्ट्रायकर म्हटले आणि स्मिथचे मानसिकदृष्ट्या बळकट खेळाडू म्हणून वर्णन केले. विराटची तुलना टेनिस दिग्गज फेडररशी करतडीव्हिलियर्सम्हणाला की त्याची तुलना कोणत्याही क्रिकेटपटूशी नसून टेनिस दिग्गज फेडररशी केली जाऊ शकते. (डेविड वॉर्नर याने सांगितला विराट कोहली-स्टिव्ह स्मिथ मधील फरक; भारतीय कर्णधाराशी तुलना करत केले 'हे' मोठे विधान)

डीव्हिलियर्स म्हणाले, "विराट कोहली हा नैसर्गिक बॉल स्ट्रायकर आहे. या प्रकरणात विराट नेमका फेडररसारखाच आहे. जर आपण स्टीव्ह स्मिथबद्दल बोललो तर ते राफेल नडालसारखे आहे. तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. तो धावा करण्याची पद्धत शोधून काढतो. त्याचा खेळ फारसा नैसर्गिक दिसत नाही परंतु तो विक्रम मोडण्यास सक्षम आहे. कोहलीने जगभरात धावा केल्या आहेत."

दुसरीकडे, विराटच्या सध्याच्या फॉर्मवर नजर टाकली तर तो क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचे अनेक विक्रम मोडू शकतो. स्कोअरचा पाठलाग करताना विराट हा महान फलंदाज सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला आहे, असेही डिव्हिलियर्सने म्हटले. सचिन आणि विराटकोहलीमधील एका खेळाडूची निवड करण्यास म्बंगवाने सांगितले तेव्हा माजी दक्षिण आफ्रिकी फलंदाज म्हणाला की सचिन हा आमच्या दोघांचा रोल मॉडेल आहे. डीव्हिलियर्स म्हणाले, सचिन माझ्या आणि विराट या दोहोंसाठी रोल मॉडेल आहे. आपल्या कारकीर्दीत त्याने जे साध्य केले ते त्याचे उत्तम उदाहरण आहे. स्वतः कोहलीदेखील सचिन तेंडुलकरची निवड करेल. वैयक्तिकरित्या मी स्वत: बद्दल बोललो तर मी माझ्या आयुष्यात विराटसारखारनचेजर पाहिला नाही. सचिन हा सर्व परिस्थितीत एक चांगला खेळाडू होता पण रनचेज करण्याच्या बाबतीत विराट त्याच्या पुढे आहे."