PBKS vs KKR: सामन्यात अचानकपणे बंद पडला फ्लडलाइट्स, पैसे जातात कुठे म्हणत नेटकऱ्यांनी घेतली BCCI ची शाळा
दुसऱ्या डावासाठी दोन्ही संघ मैदानावर येताच मैदानावरील फ्लडलाइट्सने त्यांना दगा दिला आणि त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला.
पंजाब किंग्जने (Punjab Kings) मोहालीमध्ये तीन वर्षांनंतर आयपीएलचे (IPL) पुनरागमन मोठ्या थाटात साजरे केले. शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली प्रथमच पंजाब किंग्जने IPL 2023 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 7 धावांनी (डकवर्थ-लुईस नियम) पराभव केला. प्रथम भानुका राजपक्षेने (Bhanuka Rajapakse) कोलकात्याची धुलाई करत पंजाबला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्यानंतर अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) स्विंगिंग बॉल्सने केकेआरची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली.
केकेआरने स्वत:साठी थोडीशी संधी निर्माण केली असतानाही ती पावसाने हिरावून घेतली, तिथे नितीश राणाचा संघ मागे राहिला. दुसऱ्या डावासाठी दोन्ही संघ मैदानावर येताच मैदानावरील फ्लडलाइट्सने त्यांना दगा दिला आणि त्यामुळे सामना सुरू होण्यास विलंब झाला. काही वेळ प्रतीक्षा केल्यानंतर दोन्ही संघ डगआऊटमध्ये परतले. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. हेही वाचा PBKS vs KKR: डकवर्थ लुईस नियमानुसार पंजाब किंग्जचा कोलकाता नाईट रायडर्सवर 7 धावांनी विजय
लोकांनी आयपीएल आणि बीसीसीआयची खिल्ली उडवली. काहींनी लिहिले की जेव्हा पीएसएलमध्ये दिव्यांची समस्या होती तेव्हा जगाने त्याची खिल्ली उडवली आणि आता भारतातही तेच होत आहे. एका यूजरने लिहिले की, पंजाबच्या स्टेडियममध्ये लाईट नाहीत, आयपीएल ही एक चेष्टा आहे, पैसा कुठे जातोय, सुमारे 20 मिनिटांनी लाईट लावता आली आणि मग कोलकात्याची इनिंग सुरू झाली.