IND vs PAK, Asia Cup 2022: आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर संतापला, बाबर आझमच्या कर्णधारपदावर प्रश्न केला उपस्थित

पाकिस्तानच्या पराभवासाठी शोएब अख्तरने बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदाला जबाबदार धरले आहे.

शोएब अख्तर (Photo Credit: Instagram)

आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत भारताविरुद्ध 5 विकेटने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ (Pakistan Team) लक्ष्यावर आहे. पाकिस्तानच्या पराभवामुळे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच संतापला आहे.  पाकिस्तानच्या पराभवासाठी शोएब अख्तरने बाबर आझमच्या (Babar Azam) कर्णधारपदाला जबाबदार धरले आहे. अख्तरने पाकिस्तानच्या बॅटिंग ऑर्डरवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ 19.5 षटकात 147 धावा करत ऑलआऊट झाला. टीम इंडियाने हे लक्ष्य 19.4 षटकात 5 विकेट गमावून पूर्ण केले.

पाकिस्तानच्या संथ फलंदाजीवर निशाणा साधत अख्तर म्हणाला, रिजवानसारख्या खेळाडूने 45 चेंडूत 45 धावा केल्या तर काय फरक पडेल. रिझवानने पॉवरप्लेमध्ये 19 डॉट बॉल खेळले. जर तुम्ही पॉवरप्ले असाच जाऊ दिला तर ते कठीण होणार आहे.अख्तर पुढे म्हणाला, मी बाबर आझमला अनेकदा सांगितले आहे की त्याने टी20 फॉरमॅटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. हेही वाचा Asia Cup 2022: भारत पाकिस्तान सामन्यात विजयी षटकारापूर्वी हार्दिक पांड्या याची आत्मविश्वासपूर्ण भावमुद्रा सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)

फखर जमानला रिझवानसोबत ओपन करावे. आसिफ अलीच्या आधी शादाब खानला फलंदाजीसाठी पाठवले. बाबर आझम कसा कर्णधार बनण्याचा प्रयत्न करत होता, हे माझ्या आकलनापलीकडचे होते. शोएब अख्तरने भारताच्या प्लेइंग 11 वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, भारतानेही सामना हरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.  रोहितलाही कळत नव्हते की कर्णधारपद कसे होते.

ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. पण अखेर भारताला हा सामना जिंकण्यात यश आले. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला प्राधान्य दिले होते. दिनेश कार्तिक टीम इंडियासाठी विकेटकीपरसह फिनिशरची भूमिका बजावत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif