Pro Kabaddi League 2019: Gujrat Fortune Giants संघाने Dabang Delhi ला हरवत सलग तिसऱ्यांदा मिळवला विजय

ज्यात 31 - 26 च्या फरकाने गुजरातने दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला, यासोबतच यंदाच्या सीझन मधील गुजरातचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे.

Gujrat Fortune Giants Defeats Daband Delhi (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League 2019)  सातव्या सीजनचा 20 वा सामना गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Gujrat Fortune Giants) आणि दबंग दिल्ली (Dabang Delhi)  या संघांमध्ये मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इंडोर स्टेडियम मध्ये पार पडला. ज्यात 31- 26 च्या फरकाने गुजरातने दिल्लीवर दणदणीत विजय मिळवला, यासोबतच यंदाच्या सीझन मधील गुजरातचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. आजच्या सामन्यात गुजरातने सुरुवातीला थोडी लीड घेत आपला उत्तम खेळ सुरु केला होता. मात्र दबंग दिल्लीने खेळात वापसी करून पहिल्या हाफच्या आधी गुजरातच्या टीमला ऑल आऊट केले आणि तीन गुणांची बढत घेतली होती. दुसऱ्या हाफ मध्ये गुजरातच्या संघाने आपला परफॉर्मन्स बळकट करत पुन्हा एकदा पॉईंट्स समान केले. आणि मग दोन्ही संघ कमी अधिक फरकाने मागे पुढेच खेळत होते.

आजच्या मॅच मध्ये दबंग दिल्लीचा पराभव झाला असला, तरी नवीन कुमारने आपल्या सुपर दहाने दिल्लीच्या चाहत्यानां थोडीशी आशा दिली होती. सोबतच चंद्रन रंजीत याने सुद्धा पाच पॉईंट्स मिळवून संघाला सामन्यात पुढे आणले होते. तर गुजरातच्या संघात जीबी मोरे याने ५ पॉईंट्स आणि रोहित गूलिया याने ८ पॉईंट्स घेत टीमला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

दरम्यान, आजवरचा दोन्ही संघाचा परफॉर्मन्सची तुलना केल्यास गुजरातच्या संघाने पहिल्या सामन्यात बेंगळुरू बुल्सला  तर दुसऱ्या सामन्यात युपी योद्धाला  मोठ्या तफावतीने पराभूत केले होते, मात्र आजच्या सामन्यात विजयासाठी गुजरातच्या टीमला अगदी अटीतटीच्या सामना लढावा लागला होता. तर दुसरीकडे, यंदाच्या सीझन मध्ये दबंग दिल्ली संघाने सुद्धा कमालीचा परफॉर्मन्स दाखवला आहे, सिजनमधील सलग सात विजयानंतर आज मात्र दिल्लीला पहिला पराभव पत्करावा लागला आहे. दिल्लीने पहिल्या सामन्यात तेलगू टायटन्सला , दुसऱ्या सामन्यात तमिल थलाइवाज, त्यापाठोपाठ हरियाणाला हरवले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif