Pakistan vs England Test Head To Head: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीत कोणाचे पारडे जड? पाकिस्तान संघ मायदेशात कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर

दोन्ही संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला.

PAK vs ENG (Photo: @TheRealPCB)

Pakistan vs England Test Head To Head: पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा कसोटी सामना 15  ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना मुलतानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला. या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या 149 षटकात 556 धावांवर सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने 150 षटकांत 7 बाद 823 धावा करत पहिला डाव जिंकला आणि 267 धावांची आघाडीही मिळवली. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 317 धावांची शानदार खेळी केली.

प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ दुसऱ्या डावात 220 धावांत गारद झाला आणि इंग्लंडने विजय मिळवला. यासह पाहुण्या संघाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता दुसरा कसोटी सामना जिंकून इंग्लंडच्या नजरा मालिका जिंकण्यावर असणार आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान संघ पुन्हा एकदा मायदेशात कसोटी मालिका गमावण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत पाकिस्तानच्या संघाला दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे.

दोन्ही संघांनी दुसऱ्या कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग 11 ची घोषणा देखील केली आहे. इंग्लंडचा प्लेइंग 11 कर्णधार बेन स्टोक्स आणि मॅथ्यू पॉट्स परतले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानने प्लेइंग 11 मध्ये अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे. ज्यामध्ये कामरान गुलाम, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद मेहमूद यांना संधी मिळाली आहे.

दोन्ही संघांमधील हेड टू हेड आकडेवारी

कसोटीत पाकिस्तान आणि इंग्लंडचे संघ आतापर्यंत 90 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात इंग्लंडचा वरचष्मा दिसत आहे. इंग्लंडने 30 सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानने केवळ २१ सामने जिंकले आहेत.

याशिवाय ३९ कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. या दोन्ही संघांची शेवटची भेट २०२२ मध्ये झाली होती. त्यानंतर इंग्लंडने पाकिस्तानवर कसोटी मालिका 3-0 अशी जिंकली. उभय संघांमधील शेवटच्या पाच कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर येथे इंग्लंडचे वर्चस्व दिसून येते. इंग्लंडने 5 पैकी 4 सामने जिंकले आहेत. एक सामना ड्रॉ झाला होता.

दोन्ही संघातील 11 खेळाडू 

इंग्लंड : जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (सी), जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच, शोएब बशीर.

पाकिस्तान : सईम अयुब, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सलमान अली आगा, आमिर जमाल, नोमान अली, साजिद खान, जाहिद महमूद.