जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बजरंग पुनिया आणि रवि कुमार, 2020 Tokyo Olympics चे तिकीटही मिळवले
यासह भारताच्या तीन पैलवानांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. बुधवारी विनेश फोगाट ने महिला कुस्तीमध्ये कांस्यपदकासह पहिला ऑलिम्पिक कोटा मिळविला.
बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि रवी कुमार (Ravi Kumar), भारताचे हे दोन कुस्तीपटूंनी टोकियो ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. कझाकस्तानच्या नूर-सुलतान येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wrestling Championship) गुरुवारी सेमीफायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे बजरंग आणि रवि यांनी 2020 च्या ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. 65 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने उत्तर कोरियाच्या जोंग सोनचा 8-2 असा पराभव केला, तर रविने 57 किलोग्राम वजनी गडात उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या युकी तकााहाशीचा 6-1 असा पराभव केला. यासह भारताच्या तीन पैलवानांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळविली आहे. बुधवारी विनेश फोगाट ने महिला कुस्तीमध्ये कांस्यपदकासह पहिला ऑलिम्पिक कोटा मिळविला.
आपल्या क्वार्टर बाऊटच्या पहिल्या मिनिटाला बजरंग 0-1 ने पिछाडीवर पडला होता. पण तो त्वरित पुनरमां केले आणि ब्रेकपर्यंत 4-1 अशी आघाडी मिळवली. दुसर्या फेरीत सनने बजरंगच्या पायांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुनरागमन करण्यासाठी ते पुरेसे नव्हते. दुसरीकडे महिला गटात साक्षी मलिक 62 किलो वजनाच्या गटात पराभूत झाली. नायजेरियाच्या अमिनत अडेनियने त्याला 10-7 ने पराभूत केले. तर, पुरुष गटात रविने 57 किलो वजनी गटात पाच फूट उंच कोरियाच्या किम सुंग गॉनला पहिल्या फेरीत 11-0 ने पराभूत केले. रवीने सामन्यात चांगली सुरुवात केली आणि पहिला 2-0 अशी आणि नंतर 4-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने सामना 6-1 ने जिंकल्यानंतर अंतिम चारमध्ये प्रवेश केला आणि ऑलिम्पिकचे तिकीटही मिळवले.
दरम्यान, आज सर्वांच्या नजरा पूजा धांडा हिच्यावरदेखील असतील. 59 किलो वजनी गटात पूजा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचून पराभूत झाली होती, त्यामुळे आता ती कांस्यपदकासाठी मॅटवर उतरणार आहे.