US Open 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नंबर 1 अॅश बार्टीची पीछेहाट; जोकोविच, नडाल, सेरेना विल्यम्सचा न्यूयॉर्कमधील यूएस ओपन ट्यून-अप स्पर्धेत सहभाग
दुसरीकडे, माजी चॅम्पियन नोवाक जोकोविच, राफेल नडाल आणि सेरेना विल्यम्स पुढच्या महिन्यात न्यूयॉर्कमधील वेस्टर्न अँड सदर्न ओपनमध्ये सहभाग निश्चित केला आहे.
कोरोना व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या चिंतेमुळे जगातील प्रथम क्रमांकाची महिला टेनिसपटू अॅश बार्टीने (Ash Barty) अमेरिकन ओपन (US Open) आणि न्यूयॉर्क येथे होणाऱ्या स्पर्धेतून माघार घेतली. गुरुवारी बार्टीच्या मॅनेजरने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, “मी आणि माझ्या संघाने निर्णय घेतला आहे की आम्ही यावर्षी वेस्टर्न अँड साऊथन ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी अमेरिकेला जाणार नाही.” ती पुढे म्हणाली, “मला दोन्ही स्पर्धा आवडतात म्हणून हा एक कठीण निर्णय होता परंतु कोविड-19 मुळे अद्याप त्यात अनेक महत्त्वपूर्ण जोखीम आहेत आणि मला माझ्या संघाला आणि त्या स्थितीत उभे राहणे मला समाधानकारक वाटत नाही. मी यूएसटीएला (USTA) या स्पर्धेसाठी शुभेच्छा देते आणि पुढच्या वर्षी अमेरिकेत परत येण्याची उत्सुकता आहे." सिनसिनाटीमध्ये दरवर्षी होणाऱ्या वेस्टर्न अँड सदर्न ओपनला (Western & Southern Open) यंदा न्यूयॉर्क येथे हलविण्यात आले असून ऑगस्टच्या मध्यापासून त्याची सुरुवात होईल.
दुसरीकडे, माजी चॅम्पियन नोवाक जोकोविच, राफेल नडाल (Rafael Nadal) आणि सेरेना विल्यम्स (Serena Williams) पुढच्या महिन्यात न्यूयॉर्कमधील वेस्टर्न अँड सदर्न ओपनमध्ये सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा यूएस ओपन ट्यून-अप म्हणून काम करेल, असे स्पर्धेचे आयोजकांनी बुधवारी सांगितले. ऑगस्ट 20 ते 28 दरम्यान न्यूयॉर्क येथे स्पर्धा खेळली जाईल. गतविजेत्या डेनिल मेदवेदेव आणि मॅडिसन कीस यांचा देखील प्रारंभिक प्रवेश आहे. एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धा पुरुषांच्या दिनदर्शिकेतला पहिला कार्यक्रम असेल कारण व्हायरसमुळे मार्च महिन्यापासून टेनिस स्पर्धा थांबवण्यात आल्या होत्या. महिला डब्ल्यूटीए टूरने देखील सोमवारपासून सिसिलची राजधानी असलेल्या पालेर्मो लेडीज ओपन पासून परत येण्याचे संकेत देईल.
दरम्यान, ऑगस्ट 31 पासून यूएस ओपनला सुरुवात होणार असून ते क्वीन्सच्या फ्लॅशिंग मीडोज येथे त्याच्या नेहमीच्या घरात होईल, परंतु व्हायरसचा प्रसार मर्यादित करण्यासाठी चाहत्यांशिवाय खेळला जाईल. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा जोकोविच आणि 23 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन सेरेना हे अमेरिकन ओपन स्पर्धेत अपेक्षित खेळाडूंपैकी आहेत.