महिला वर्ल्ड कप 2019- दिवस 25 Google Doodle: FIFA Women's World Cup मधील आज होणाऱ्या अंतिम सामन्यानिमित्त गुगुलचे खास डुडल
या निमित्ताने गुगलने खास डुडल साकारले आहे.
महिला फुटबॉल वर्ल्ड कपला (Women's World Cup 2019) 7 जून पासून सुरुवात झाली. आज (7 जुलै) वर्ल्ड कपचा 25 वा दिवस असून अमेरिका आणि नेदरलँड या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या निमित्ताने गुगलने खास डुडल साकारले आहे. कलरफुल असलेल्या या डुडलमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.
फिफा महिला फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये 8 संघ सहभागी झाले होते. त्यात अमेरिकन संघांचाही समावेश होता. यापूर्वी अमेरिकन संघांने तीन वेळा वर्ल्ड कप आपल्या नावे केला आहे. आज चौथ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी अमेरिकन संघ सज्ज झाला आहे. (पॅरिस मध्ये रंगणाऱ्या FIFA World Cup मधील पहिल्या सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल)
यंदा महिला वर्ल्ड कपमध्ये चिली, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, आणि जमैका या चार नव्या संघांनी पर्दापण केले होते.