When is Bajrang Punia's Bronze Medal Match: ऑलिम्पिक कांस्य पदकासाठी Bajrang Punia याचा निर्णायक मुकाबला कधी व किती वाजता होणार?

आता बजरंगकडून कांस्य पदकाची अपेक्षा असेल. यासह पुनियाचा सामना रशियाचा गडझीमुराद रशिदोवशो होईल. पुनिया आणि रशिदोव यांच्यातील ऑलिम्पिक कुश्ती कांस्यपदक सामना आता भारतीय वेळेनुसार दुपारी 3:55 वाजता सुरु होईल.

बजरंग पुनिया (Photo Credit: PTI)

When is Bajrang Punia's Bronze Medal Match: टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक खेळात (Olympic Games) भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनियाचा (Bajrang Punia) तीन वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता अझरबैजानच्या हाजी अलीवने सेमीफायनल सामन्यात पराभूत झाला. बहुतेक लढतींमध्ये पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय ग्रॅपलरने अंतिम मिनिटात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला पण अझरबैजानच्या कुस्तीपटूने आपला दबदबा कायम बजरंगला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. अलीवने बजरंगला 12-5 ने पराभूत केले. यासह कुश्ती खेळात पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंग झाले. आता बजरंगकडून कांस्य पदकाची अपेक्षा असेल. यासह पुनियाचा सामना रशियाचा (Russia) गडझीमुराद रशिदोवशो (Gadzhimurad Rashidov) होईल. पुनिया आणि रशिदोव यांच्यातील ऑलिम्पिक कुश्ती कांस्यपदक सामना आता भारतीय वेळेनुसार दुपारी 4:05 वाजता सुरु होईल. (Tokyo Olympics 2020: पैलवान Bajrang Punia सेमीफायनल सामन्यात पराभूत, कांस्य पदकाच्या आशा कायम)

दरम्यान, पुनिया कांस्यपदक सामन्यात यशस्वी ठरला तर टोकियो ऑलिम्पिक कुश्ती खेळातील भारताचे ते दुसरे पदक ठरेल. यापूर्वी कुस्तीपटू रवी दहियाने गुरुवारी 57 किलो वजनी गटात भारतासाठी  रौप्यपदक जिंकले होते. तसेच 87 किलो फ्रीस्टाईल कुस्ती सामन्यात भारताच्या हातून कांस्यपदक निसटले आहे. सॅन मारिनोच्या कुस्तीपटूने 2-4 ने पराभूत करत भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाचे टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्यपदक जिंकण्याचे स्वप्न भंग केले. सुरुवातीला आघाडी घेऊनही दीपकने सामना 2-4 असा गमावला.

दुसरीकडे, बजरंगला कुश्ती खेळातील वैयक्तिक पहिले आणि भारतासाठी सातवे ऑलिम्पिक पदक जिंकण्याची देखी संधी आहे. खाशाबा जाधव यांनी या खेळात देशासाठी पहिले पदक जिंकले होते. त्यांच्यानंतर सुशील कुमार, योगेश्वर दत्त, साक्षी मलिक आणि टोकियोमध्ये रवी कुमार दहिया यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले आहेत. विशेष म्हणजे सुशील कुमारने 2008 बीजिंग आणि 2012 लंडन ऑलिम्पिक खेळात सलग दोन पदक जिंकण्याचा मान मिळवला आहे.