US Open 2020 Final: ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमची अलेक्झांडर झ्वेरेववर मात, 6 वर्षात पहिल्यांदाच युएस ओपनला मिळाला नवा विजेता

ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिमने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला पराभूत करून आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले. थीमने रविवारी यू.एस. ओपन फायनलमध्ये थिएमने झ्वेरेवला 2-6 4-6 6-4 6-3 7-6(6) ने पराभूत केले. 4 तास 2 मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन स्पर्धेला नवा विजेता मिळला.

डोमिनिक थीम (Photo Credits: Twitter/US Open)

ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थिमने (Dominic Thiem) जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवला (Alexander Zverev) पराभूत करून आपले पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळविले. थीमने रविवारी यूएस ओपन फायनलमध्ये (US Open Final) थिएमने झ्वेरेवला 2-6 4-6 6-4 6-3 7-6(6) ने पराभूत केले. 4 तास 2 मिनिटे सुरु असलेल्या या सामन्यात सहा वर्षात पहिल्यांदाच युएस ओपन (US Open) स्पर्धेला नवा विजेता मिळला. पहिल्या दोन सेटमध्ये पराभव झाल्यानंतर थिमने जोरदार पुनरागमन करत शेवटचे तीनही सेट जिंकले. जगातील तिसर्‍या क्रमांकाच्या 27 वर्षीय थीम यापूर्वी, फ्रेंच ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन फायनल फेरीत पोहचला होता, पण त्या तीनही अंतिम फेरीत त्याला पराभव पत्करावा लागला होता. 2004 फ्रेंच ओपनमध्ये गॅस्टन गौडिओनंतर (Gaston Gaudio ) दोन सेटमध्ये पिछाडीवर असून ग्रँड स्लॅम जिंकणारा थीम पहिला खेळाडू ठरला. थिमविरुद्ध सलामीच्या पहिल्या दोन सेटमध्ये झ्वेरेवने 2-6, 4-6 अशी आघाडी घेतली होती, पण नंतर थीमने दमदार पुनरागमन करत 6-4, 6-3, 7-6 अशा फरकाने अन्य सेट जिंकले आणि विजेत्याचा मान मिळवला.

1996 मध्ये बोरिस बेकरनंतर न्यूयॉर्कमध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारा पहिला जर्मन पुरुष होण्याची बोली असणाऱ्या 23 वर्षीय झ्वेरेवने थीमविरुद्ध अतिशय शांतता दर्शविली आणि जेतेपदाच्या जवळ होता, मात्र थीमने आपला फॉर्म मिळवला आणि सामना अंतिम सेटपर्यंत नेला. राफेल नडाल आणि रॉजर फेडरर यांनी पूर्वीच स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे सर्बियाच्या नोवाक जोकोविचला युएस ओपन स्पर्धेतील ग्रँड स्लॅमचा प्रबळ दावेदार मानला जात होता, पण जोकोविचच्या अनपेक्षित हकालपट्टीनंतर अमेरिकन ओपन टेनिसला सहा वर्षानंतर नविन विजेता मिळणार हे निश्चित झाले होते.

दरम्यान, ग्रँड स्लॅम जिंकणारा थीम ऑस्ट्रियाचा दुसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी थॉमस मस्टरचे 1995 फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकले होते. पण, पहिले ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी थीमला मोठी प्रतीक्षा करावी लागली. याआधी तीन वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात थीमचा पराभव झाला होता. दोन फ्रेंच ओपन फायनल सामन्यात थीमला 12 वेळा विजेता राफेल नडालकडून, तर यावर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचकडून पाच जबरदस्त सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now