Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: भारतीय दलाचे 5 खेळाडू, 6 अधिकारी पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात घेणार भाग; ‘हा’ खेळाडू बनणार ध्वज वाहक
भारतीय तुकडीतील केवळ सहा अधिकाऱ्यांना मंगळवारी टोकियो पॅरालिम्पिकच्या उद्घाटन समारंभात भाग घेण्याची परवानगी आहे, असे शेफ डी मिशन गुरशरण सिंह यांनी सांगितले. अशाप्रकारे उर्वरित पाच खेळाडूंसह भारताचे एकूण उद्घाटन सोहळ्यात 11 सदस्य सहभागी होतील.
Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: भारतीय तुकडीतील केवळ सहा अधिकाऱ्यांना मंगळवारी टोकियो पॅरालिम्पिकच्या (Tokyo Paralympics) उद्घाटन समारंभात भाग घेण्याची परवानगी आहे, असे शेफ डी मिशन गुरशरण सिंह (Chef de Mission Gursharan Singh) यांनी सांगितले. अशाप्रकारे उर्वरित पाच खेळाडूंसह भारताचे एकूण उद्घाटन सोहळ्यात 11 सदस्य सहभागी होतील. उद्घाटन समारंभासाठी खेळाडूंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही पण आतापर्यंत फक्त सात भारतीय सहभागी टोकियोला पोहोचले आहेत. त्यापैकी, दोन टेबल टेनिसपटू - सोनल पटेल आणि भाविना पटेल - यांची बुधवारी स्पर्धा होणार आहे आणि ते समारंभात भाग घेणार नाहीत, या दरम्यान जपानी सम्राट नारुहितो खेळाच्या उद्घाटनाची घोषणा करतील. भारताच्या पॅरालिम्पिक समितीचे सरचिटणीस शेफ डी मिशन सिंह यांनी PTI शी बोलताना सांगितले की, “उद्घाटन समारंभासाठी फक्त सहा अधिकाऱ्यांना परवानगी आहे, तर खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा नाही.” (Tokyo Paralympics 2020 India Schedule: भारतीय पॅरालिम्पिक दलाचे संपूर्ण वेळापत्रक- इव्हेंट्स, तारीखसह सर्व माहिती जाणून घ्या)
“टेबल टेनिसच्या दोन खेळाडूंमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी स्पर्धा आहे, त्यामुळे ते उद्घाटन समारंभात भाग घेत नाहीत.” 8 ऑगस्ट रोजी संपलेल्या टोकियो ऑलिम्पिक खेळाच्या उद्घाटन समारंभात देखील सहा अधिकाऱ्यांची उपस्थतीचा नियम पाळला गेला. दरम्यान, पॅरालम्पिक उद्घाटन समारंभात पाच खेळाडूंमध्ये ध्वजवाहक मरिअप्पन थंगावेलू (Mariyappan Thangavelu), डिस्क फेकणारा विनोद कुमार, भाला फेकपटू टेक चंद आणि पॉवरलिफ्टर्स जयदीप व सकिना खातून यांचा समावेश असणे अपेक्षित आहे. उद्घाटन समारंभात भाग घेणाऱ्या सहापैकी चार अधिकारी निश्चित झाले आहेत. यामध्ये शेफ डी मिशन, डेफ्युटी शेफ डी मिशन अरहान बगाती, कोविड-19 चे मुख्य संपर्क अधिकारी व्ही के दाबास आणि मरिअप्पनचे प्रशिक्षक आणि पॅरा अॅथलेटिक्स अध्यक्ष सत्यनारायण आहेत. भारतीय क्रीडापटूंची तिसरी तुकडी सोमवारी रवाना होणार आहे परंतु त्यातील काही खेळाडूंना प्रशिक्षणाची परवानगी देण्यापूर्वी क्वारंटाईन राहणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, यंदाच्या पॅरालम्पिक खेळात भारताचे प्रतिनिधित्व 54 क्रीडापटूंद्वारे केले जात आहे - जे आतापर्यंतचे सर्वात मोठे आहे आणि देशाला या वेळी सर्वोत्तम पदक मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच टोकियोमध्ये वाढत्या कोविड-19 प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, चाहत्यांच्या उपस्थितीवर मागील ऑलिम्पिक खेळांप्रमाणेच पॅरालिम्पिकमधून बंदी घालण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)