Tokyo Olympics 2020: रवी दहियाच्या हातून निसटला ‘गोल्डन’ चांस, रशियन जगज्जेत्याने अंतिम सामन्यात 7-4 ने दिला धोबीपछाड; भारताच्या पदरी दुसरे रौप्यपदक

ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले.

रवी कुमार दहिया (Photo Credit: IANS)

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळातील 57 किलो वजनी गटात भारतीय कुश्तीपटू रवी कुमार दहियाला (Ravi Kumar Dahiya) रशियन पैलवान झौर युगुएव्हने 7-4 अशा स्कोरने धोबीपछाड दिला आणि भारतीय कुश्तीपटूला रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानण्यास बाग पाडले. युगुवेने त्यांना 3 गुणांनी पराभूत केले. ऑलिम्पिक कुश्ती खेळात भारताचे हे सहावे पदक ठरले. खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिक यांनी या खेळात भारताला पदक जिंकून दिले होते. साक्षी आणि योगेश्वर यांच्याकडे कांस्यपदके आहेत. विशेष म्हणजे सुशील कुमारने सलग दोनदा ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकले आहेत. (Ravi Dahiya Bitten By Nurislam Sanayev: कझाकिस्तानच्या पैलवानने ऑलिम्पिक उपांत्य फेरीत घेतला Ravi Dahiya याच्या हाताचा चावा, सेहवाग म्हणाला लुजर)

दरम्यान, रवीने उपांत्य फेरीत त्याने कझाकस्तानच्या नुरिस्लाम सानायेव्हला चीतपट करून अंतिम फेरी गाठली होती. रवीला हा विजय फॉल रूलद्वारे मिळाला. म्हणजे त्याने नूरिस्लामला सामन्यातूनच बाहेर फेकले होते. चौथा मानांकित रवी सानायेव्हविरुद्ध लढतीत 2-9 असा पिछाडीवर होता; परंतु रवीने हिमतीने मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही पायांवर नियंत्रण मिळवत त्याला चीतपट करत फायनलमध्ये एंट्री घेतली. दरम्यान, यंदाच्या टोकियो खेळातील भारताचे हे एकूण पाच तर दुसरे रौप्य पदक ठरले आहे. यापूर्वी वेटलिफ्टर मीराबाई चानू, बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, पुरुष हॉकी टीम, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी ऑलिम्पिक खेळात भारताच्या पदक जमा केले होते. ऑलिम्पिक कुश्ती खेळात सुशील कुमारने देशासाठी सलग दोन पदके जिंकून दिली होती. सुशीलने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक आणि 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. खाशाबा जाधव ऑलिम्पिक कुस्तीमध्ये पदक जिंकणारे भारताचे पहिला कुस्तीपटू होते. 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.

दुसरीकडे, 86 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेविड मॉरिसकडून पराभूत होणाऱ्या दीपक पुनियाच्या कांस्य पदकाच्या आशा पल्लवित आहेत. आता गुरुवारी मायलीस अ‍ॅमिने यांच्यातील रॅपिचज सामन्यातील विजेत्याशी दीपकची कांस्यपदकाची लढत होईल.