Tokyo Olympics 2020: भवानी देवी हिने तलवारबाजी मध्ये दणदणीत विजय मिळवत रचला इतिसाह, ठरली पहिली भारतीय तलवारबाज
टोक्यो ऑल्पिंक मध्ये आज भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताची सीए भवानी देवी हिने इतिहास रचत ट्युनिशियाची नादिसा बेन अजिजि हिच्या विरोधात तलवारबाजीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे.
Tokyo Olympics 2020: टोक्यो ऑल्पिंक मध्ये आज भारताने शानदार सुरुवात केली आहे. भारताची सीए भवानी देवी हिने इतिहास रचत ट्युनिशियाची नादिसा बेन अजिजि हिच्या विरोधात तलवारबाजीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचसोबत ऑल्पिंकमध्ये तलवारबाजी मध्ये सामना जिंकणारी भवानी देवी भारताची पहिलीच एथलीट ठरली आहे. भवानी देवी हिने महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 62 मॅचमध्ये 15-3 च्या अंतराने एकतर्फी विजय मिळवला आहे.(Olympic Games Tokyo 2020: टेनिसपटू Sutirtha Mukherjee हिचा टोक्यो ऑलिम्पीकमध्ये आज TableTennis Singles Round सामनाना)
आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेल्या भवानी देवीने नादियाच्या विरोधात सुरुवात आपला दबदबा तयार केला आणि पहिला राउंड अगदी सहज 8-0 ने जिंकला. 27 वर्षीय भवानी देवीने दुसऱ्या राउंडमध्ये सुद्धा ट्युनीशियाची खेळाडूला जिंकण्याची संधी न देता 7-3 ने सामना आपल्या बाजूने करत अवघ्या सहा मिनिटात त्याच्यावर विजय मिळवला. पुढील सामना, टेबल ऑफ 32 मध्ये तिची टक्कर फ्रान्सची मॅनॉन ब्रुटेन सोबत झाला. पण त्यामध्ये भवानी देवी हिचा पराभव झाला आहे. .(Tokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक)
Tweet:
चेन्नईत राहणाऱ्या भवानी देवीने ऑल्पिंक मध्ये क्वालिफाय होणारी पहिली भारतीय तलवारबाज आहे. आठव्या वेळेस नॅशनल चॅम्पियन भवानी देवी कॉमनवेल्थ चॅम्पियन टीम इवेंट्स मध्ये सिल्वर आणि एक कांस्य पदक पटकावले आहे. तर चॅम्पियनशिपच्या इंडिविज्युअल इवेंटमध्ये तिच्या नावावर एक कांस्य पदत आहे. 2010 मध्ये एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिफ मध्ये सुद्धा तिला कांस्य पदक मिळाले होते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)