Tokyo Olympics 2020: भारतीय महिल्यांच्या विजयानंतर प्रशिक्षक Sjoerd Marijne यांनी मागितली माफी, पाहा काय आहे प्रकरण
Marijne ने सोशल मीडियावरून आपल्या कुटुंबाला कळवले की तो अपेक्षेपेक्षा उशिरा घरी परतणार आहे.
Tokyo Olympics 2020: टोकियो 2020 मध्ये सोमवारी उपांत्यपूर्व फेरीत विश्वविजेता ऑस्ट्रेलिया (Australa) संघावर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाचे (India Women's Hockey Team) प्रशिक्षक Sjoerd Marijne ने आपल्या खेळाडूंसोबत एक मजेदार सेल्फी पोस्ट केली. गुरजीत कौरने (Gurjit Kaur) दुसऱ्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि भारताने सामन्याचा एकमेव गोल करत तीन वेळा चॅम्पियन कांगारू संघाला पराभवाचा धक्का दिला. तिचे पहिले ऑलिम्पिक गोल इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत भारताचे स्थान निश्चित करण्यासाठी पुरेसे ठरले. मारिझने नेदरलँड्स (1-5), जर्मनी (0-2) आणि ग्रेट ब्रिटन (1-4) यांच्याविरुद्ध सलग 3 पराभवांसह टोकियो ऑलिम्पिक मोहीम सुरु केलेल्या भारतीय संघाचे (Indian Team) अवघ्या काही दिवसातच भाग्य बदलले. (Tokyo Olympics IND vs AUS Women's Hockey: पराभवानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे डोळे पाणावले, पाहा भारताच्या ऐतिहासिक विजयाचा ‘तो’ क्षण)
भारताने आयर्लंड (1-0), दक्षिण आफ्रिका (4-3) आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाची हॅट्ट्रिक नोंदवून दणदणीत पुनरागमन केले व सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. त्यानंतर Sjoerd Marijne ने सोशल मीडियावरून आपल्या कुटुंबाला कळवले की तो अपेक्षेपेक्षा उशिरा घरी परतणार आहे करत आता 4 ऑगस्ट रोजी सेमीफायनल सामन्यात Oi हॉकी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि भारतीय संघात भिडत होणार आहे. "माफ करा कुटुंब, मी नंतर पुन्हा येत आहे," Sjoerd Marijne यांनी ट्विट केले. लक्षात घेण्यासारखे म्हणजे यापूर्वी रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना जिंकून शकला नव्हता. पण यंदा त्यांनी आपली विजयी मोहीम सुरु ठेवली व पहिल्या ऑलिम्पिक सेमीफायनलमध्ये धडक मारली.
दरम्यान, भारताने सर्वोत्तम कामगिरी 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक खेळात केली आणि सहा संघांपैकी चौथे स्थान पटकावले होते. ऑलिम्पिक खेळाच्या त्या आवृत्तीत, महिला हॉकीने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले आणि हा खेळ राउंड-रॉबिन स्वरूपात खेळला गेला ज्यामध्ये शीर्ष दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. दुसरीकडे, राणी रामपाल आणि तिच्या संघापुढे आता अर्जेंटिनाचे आव्हान असेल ज्यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जर्मनीला 3-0 ने धूळ चारली.