Mirabai Chanu Road to Tokyo Glory: मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची सिल्व्हर गर्ल, जाणून घ्या तिच्या प्रवासाची कहाणी

आणि मीराबाई चानूची कहाणी याला अगदी योग्य सिद्ध करते. मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने 49 किलोग्रामच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. मीराबाई चानूने आज इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हते. यामध्ये बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. जाणून घ्या तिची प्रेरणादायी कहाणी.

मीराबाई चानू (Photo Credit: PTI)

Mirabai Chanu Road to Tokyo Glory: ऑलिम्पिक (Olympics) खेळ चिकाटी, लढा आणि विमोचन याबद्दल असतात. आणि मीराबाई चानूची (Mirabai Chanu) कहाणी याला अगदी योग्य सिद्ध करते. मणिपूरच्या 26 वर्षीय चानूने शनिवारी रिओ ऑलिम्पिकच्या (Rio Olympics) आठवणींना मागे टाकून 119 किलोग्रामच्या क्लीन अँड जर्क (Clean & Jerk) वर्ल्ड रेकॉर्डसह टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) रौप्य पदकाची कमाई केली. शनिवारी तिचा हा स्टेज होता आणि मीराबाईने याची खात्री करुन घेत भारताच्या पदकांची खाते उघडले. इतिहासात प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळवून देणारी मीराबाईने रेकॉर्ड-बुकमध्ये आपले नाव नोंदवले. 26 वर्षीय ऑलिम्पिक खेळांमध्ये रौप्यपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे. (Tokyo Olympics 2020: वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वर्गात भारताच्या Mirabai Chanu हिने पटकावले रौप्यपदक, चीनची सुवर्ण कामगिरी)

मीराबाई चानूने आज इतिहास घडवला पण हे ध्येय गाठणं सोपं नव्हते. यामध्ये बालपणी केलेले कष्ट आहेत, कठोर मेहनत आहे. चानू वयाच्या बाराव्या वर्षी तिच्या मोठ्या भावापेक्षा जास्त वजनाची लाकडं गोळा करून आणायची. लहानपणी घेतलेले तिचे कष्ट आज तिच्या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. सुरुवातीला तिने तिरंदाज बनण्याचं स्वप्न पाहिलं होतं, मात्र काही कारणांमुळे ती वेटलिफ्टिंगकडे वळली आणि आज देशातील एक आघाडीची वेटलिफ्टर बनली आहे. वयाच्या 20 व्या वर्षी ग्लासगो येथे 2014 राष्ट्रकुल स्पर्धा जिंकत चानूने आपले कौशल्य दाखवले. तथापि, दोन वर्षांनंतर निराशा झाली आणि जेव्हा ती क्लीन अँड जर्क गटात तिच्या तीनपैकी कोणत्याही प्रयत्नात वजन उचलू शकली नाही. मात्र जिद्द आणि चिकाटीने 2017 मध्ये मीराबाईने जोरदार कमबॅक केलं आणि वेट लिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन दशकांहून अधिक काळानंतर सुवर्णपदक जिंकणारी ही पहिली भारतीय खेळाडू ठरली.

2018 मध्ये लोअर बॅकच्या दुखापतीने तिला बहुतेक स्पर्धेतून बाहेर राहावे लागले पण 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या कारकीर्दीत पहिल्यांदा 200 किलो वजन उचलून तिने उल्लेखनीय पुनरागमन केले. लिफ्ट असूनही ती केवळ चौथ्या स्थानावर राहिली परंतु हा तिच्या करिअरमधील उचचांक ठरला. तेव्हा मीराबाईने 2021 एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये क्लीन अँड जर्क गटामध्ये 119 किलो वजन वाढवण्याचा नवा विक्रम नोंदविला. आणि आता पुन्हा एकदा तिने भारताचं नाव अभिमानाने उंचावलं आहे.