Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताकडून विक्रमी संख्येत खेळाडूंची निवड, टोकियो येथील पदकांच्या दावेदारांबाबत घ्या जाणून

या स्पर्धेसाठी भारताच्या 119 खेळाडूंसह एकूण 228 सदस्यीय पथक टोकियोला रवाना होणार असून हे सर्व खेळाडू एकूण 85 स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. टीम इंडिया यंदा अधिक चांगल्या खेळासाठी अपेक्षित आहेत आणि त्यापैकी बरेच जण बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राइम फॉर्ममध्ये आहेत. तसेच खालील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पादकाचे मुख्य दावेदार आहेत.

विनेश फोगाट आणि अमित पंघाल (Photo Credit: PTI)

India at Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकची वेळ जवळ आली आहे. कोविड-19 महामारीमुळे गेल्या वर्षी स्थगित झालेली 23 जुलैपासून जपानच्या राजधानीत खेळाच्या सर्वात मोठ्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. टोकियोमध्ये (Tokyo) नवीन संक्रमणाची चिंता असूनही शोपीस इव्हेंटसाठी खेळाडूंची तुकडी टोकियोला पोहचत आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या (India) 119 खेळाडूंसह एकूण 228 सदस्यीय पथक टोकियोला रवाना होणार आहे. या पथकामध्ये 119 खेळाडूंपैकी 67 पुरुष आणि 52 महिलांचा सहभाग असून हे सर्व खेळाडू एकूण 85 स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे. 2016 रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीला मागे टाकून टीम इंडिया  (Team India) यंदा अधिक चांगल्या खेळासाठी अपेक्षित आहेत आणि त्यापैकी बरेच जण बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राइम फॉर्ममध्ये आहेत. तसेच खालील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पादकाचे मुख्य दावेदार आहेत. (Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक कोविड-19 चा शिरकाव, ब्राझीलच्या ऑलिम्पिक ज्युडो संघाचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील अनेक कर्मचारी संक्रमित)

पीव्ही सिंधू (PV Sindhu)

भारताची स्टार शटलर सिंधूकडून देशवासियांना मोठी अपेक्षा आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी 26 वर्षीय सिंह दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकण्यासाठी सुशील कुमारनंतर केवळ दुसरी खेळाडू बनली. सिंधूने यंदा वर्षाच्या सुरूवातीस ऑल इंग्लंड उपांत्य फेरी गाठली होती, परंतु 2019 मध्ये विश्वविजेतेपदाच्या विजयानंतर ती एकही पदक जिंकू शकली नाही. तिला खेळात 6वे मानांकन मिळाले असून सहज ड्रॉ असल्याने ती उपांत्यपूर्व फेरी गाठू शकते.

एमसी मेरी कोम (MC Mary Kom)

2012 ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी देशासाठी गौरव मिळवण्यासाठी यंदा ऑलिम्पिक स्पर्धेत झळकेल जे तिचे बहुधा अखेरचे असेल. 6 वेळा विश्वविजेतेपदासाठी भारताच्या उद्घाटन समारंभात ध्वजवाहकांपैकी एक असेल. या ज्येष्ठ बॉक्सरने 2021 मध्ये आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकून ठसा उमटविला. मेरीसाठी ही एक कठीण परीक्षा असेल परंतु ती तिच्या अनुभवामुळे तिला महिलांच्या 51 किलो वजनात पुढे जाऊ शकते.

मीराबाई चानू (Mirabai Chanu)

सध्या जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या मीराबाई चानू 2000 मध्ये कर्णम मल्लेश्वरीनंतर ऑलिम्पिक पदक जिंकून दुसरे भारतीय वेटलिफ्टर ठरतील. आणि उत्तर कोरियाच्या गेम्समधून माघार घेण्याच्या निर्णयामुळे चानूच्या आशाच वाढल्या आहेत. तिची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी उत्तर कोरियाच्या री सॉंग गमने 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चानूच्या 201 किलो वजनाच्या विरुद्ध 204 किलो वजन उंचावले होते ज्यामुळे चानूला ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले होते. पण, आता स्वतःस सिद्ध करण्याचा चानूचा निर्धार असेल.

विनेश फोगाट (Vinesh Phogat)

विनेश तिच्या आडनावामुळे नव्हे तर यावर्षी ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत असलेल्या फॉर्ममुळे टोकियो येथे भारतासाठी पदकाची मुख्य दावेदार असेल. राष्ट्रकुल खेळ व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, विनेश 53 किलो वयोगटातील जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून मॅटवर उतरेल. 2021 मध्ये झालेल्या सर्व खेळांमध्ये विनेशने सुवर्णपदकाची कमाई केली.

दीपिका कुमारी (Deepika Kumari)

दीपिका कुमारीने यावर्षी फॉर्ममध्ये पुनरागमन करत तिरंदाजी वर्ल्ड कप स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आणि जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले. पाच वर्षांपूर्वी दीपिका रिओमध्ये निराशाजनक झाली होती कारण तिला अपेक्षित दबावाला सामोरे जाऊ शकली नाही. परंतु बहु-अनुभवी दीपिकाचा तिच्या टीकाकारांना चुकीचं सिद्ध करण्याचा निर्धार असेल आणि वैयक्तिक आणि मिश्र संघ या दोन्ही स्पर्धांचे प्रबळ दावेदार म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.

अमित पंघाल (Amit Panghal)

मे महिन्यात आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक गमावल्यानंतर पंघाल टोकियोमध्ये ऑलिम्पिक रिंगच्या आत सूड घेण्याच्या शोधत असेल. पंघालला उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक चॅम्पियन शाखोबिदीन झोइरोवविरुद्ध पराभव पत्करावा लागला. गेल्या वर्षी बॉक्सिंग वर्ल्ड कपमधील सुवर्णपदक त्याच्या कर्तृत्वाचा पुरावा देतात.

सौरभ चौधरी (Saurabh Chaudhary)

19 वर्षीय शूटर टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाजी मारू शकतो. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने बरीच मेहनत घेतली आहे आणि सौरभ सातत्याने खेळण्याच्या प्रयत्नात आहेत. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या युवा शूटरने 5 विश्वचषकात 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत पदक जिंकले आहे. जून महिन्यात अलीकडेच 2 सुवर्ण पदके, 2 रौप्य पदक आणि एक कांस्यपदक जिंकणारा सौरभ शूटिंग स्पर्धेत भारताचा मुख्य आकर्षण असेल.