Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकच्या 'सुपर शनिवार'मध्ये आज रंगणार भारत-पाकिस्तान लढत, भालाफेक फायनलमध्ये Neeraj Chopra आणि अर्शद नदीम यांच्यात काट्याची टक्कर
स्टार भालाफेकपटू नीरज चोपडा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये पदक मिळवून देऊ शकतो. अंतिम फेरीत नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अर्शद नदीम असेल. नदीमने 85.16 मीटर अंतर कापून अंतिम फेरीत पोहोचला आहे. नीरज ग्रुप ए तर पाकिस्तानचा अर्शद नदीमही त्याच्या गटात अव्वल राहिला होता.
Tokyo Olympics 2020: भारत टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. आणि आता स्टार भालाफेकपटू (Javelin) नीरज चोपडा (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला ट्रॅक अँड फील्ड इव्हेंटमध्ये पदक मिळवून देऊ शकतो. 23 वर्षीय नीरजकडून टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक खेळात भारताच्या पदकाची प्रतीक्षा संपुष्टात आणू शकतो. 23 वर्षीय नीरजने पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकला होता. अंतिम फेरीत नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) अर्शद नदीम (Arshad Nadeem) असेल. नदीमने 85.16 मीटर अंतर कापून अंतिम फेरीत पोहोचला आहे. नदीमने ब गटात अव्वल स्थानावर राहून विजेतेपद सामना गाठला आहे. एकूण 12 खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. (Tokyo Olympics 2020: गोल्फमध्ये पदकाचे स्वप्न भंगलं, भारतीय खेळाडू अदिती अशोक चौथ्या स्थानी)
भारताचा नीरज चोपडा ग्रुप ए तर पाकिस्तानचा अर्शद नदीमही त्याच्या गटात अव्वल राहिला होता. भारत-पाकिस्तान यांच्यातील या सामन्याची क्रिकेट सामन्याप्रमाणे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच दोन्ही देशांचे लोक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भालाफेकची अंतिम फेरी 7 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4.30 वाजता सुरु होईल. पात्रता फेरीत नीरज आणि अर्शद नदीमची कामगिरी पाहता हा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे, कारण दोघेही भाला फेक ऑलिम्पिक पदकासाठी सर्वतोपरीने प्रयत्नशील असतील हे निश्चित आहे. नीरज आणि अर्शद यापूर्वी देखील आमनेसामने आले होते जिथे दोघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली होती. 2016 मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नदीमने कांस्यपदक जिंकले होते तर नीरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यानंतर नदीमने आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले, जिथे चोपडाने पुन्हा सुवर्णपदकावर कब्जा केला.
दरम्यान, नीरज चोपडाने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंग अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपद्वारे ऑलिम्पिक तिकीट मिळवले होते. त्याने 87.86 मीटर भाला फेकून, 85 मीटरची अनिवार्य पात्रता लाईन ओलांडून ही कामगिरी बजावली होती.