Tokyo Olympics 2021: टोकियो ऑलिम्पिक 2021 स्पर्धेसाठी 42 स्थान निश्चित, 23 जुलै रोजी होणार उद्घाटन सोहळा

पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमधील 42 स्पर्धेचे ठिकाण निश्चित केले गेले असून स्पर्धेचे वेळापत्रक यंदा जसे होते होतेच राहील असे आयोजकांनी म्हटले.

टोकियो ऑलिम्पिक 2020 (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेच्या कार्यक्रमात जवळपास एकसारखे स्पर्धा वेळापत्रक पाळले जाईल, असे आयोजकांनी शुक्रवारी सांगितले. 2020 मध्ये जपानच्या टोकियो (Tokyo)शहरात ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात येणार होते, मात्र कोरोनामुळे जागतिक स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करणे शक्य नसल्यानेखेळ पुढील वर्षापर्यंत स्थगित केले गेले. अशा परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमधील 42 स्पर्धेचे ठिकाण निश्चित केले गेले असून स्पर्धेचे वेळापत्रक यंदा जसे होते होतेच राहील असे आयोजकांनी म्हटले. खेळ गावे व मुख्य मीडिया सेन्टरमधेही आयोजित केले जातील. टोकियो आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) सदस्यांना दिलेल्या संदेशात ही माहिती दिली. त्यांनी जपानमधील आयओसी सदस्यांशी ऑनलाईन सत्रात विधान केले. (Coronavirus: 'माझी सगळी पदकं तुमची', ऑलिम्पिक 'गोल्डन गर्ल' कॅरोलिना मारिनचा करोनाशी सामना करणाऱ्या योद्धांना सलाम)

नव्याने बांधलेल्या नॅशनल स्टेडियममध्ये 23 जुलै 2021 रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्याची नवीन तारीख यापूर्वीच जाहीर केली गेली होती. या खेळांचे आयोजन यावर्षी 24 जुलै रोजी होणार होते. टोकियो 2020 चे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो म्हणाले, “आम्ही आज ही बातमी सांगण्यास सक्षम आहोत की आम्ही स्पर्धेचे वेळापत्रक आणि यावर्षी आयोजित केलेल्या सर्व ठिकाणांच्या वापराची पुष्टी केली आहे ज्यात अ‍ॅथलीट्स गाव आणि मुख्य प्रेस सेंटरच्या जागेचा समावेश आहे." जपानमध्ये केलेल्या अंदाजानुसार, एक वर्षासाठी स्थगित केलेल्या खेळामुळे आयोजकांना दोन ते सहा अब्ज डॉलर्स जादा खर्च करावा लागणार आहे.

उद्घाटन सोहळा 23 जुलै 2021 रोजी होईल, तर महिला सॉफ्टबॉल आणि फुटबॉल स्पर्धा 21 जुलैपासून होईल. 22 जुलैपासून तिरंदाजी व पुरुषांचा फुटबॉल, तर 23 जुलै रोजी रोईंग सुरु होईल. प्रथम पदक स्पर्धा 24 जुलै रोजी महिलांची 10 मीटर एअर रायफल असेल. खेळांच्या बाबतीत ही सर्वात मोठी स्पर्धा असून यामध्ये एकूण 339 मेडल्स उपलब्ध आहेत. दरम्यान, आयओसी अध्यक्ष थॉमक बाक यांनी आयओसी अध्यक्षपदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असल्याचेम्हटले आहे.