Tokyo 2020: कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान सूर्य किरणांनी पेटली टोकियो ऑलिम्पिकची मशाल, Video पाहून व्हाल थक्क
हे खेळ पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होतील असे आयोजकांनी सांगितले असून आयओसीने असेही म्हटले आहे की खेळ पुढे ढकलल्याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही.
जगभरात सध्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) उद्रेक झाला आहे आणि प्रत्येक येणाऱ्या दिवसाबरोबर टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान, ग्रीसमधील (Greece) कोरोना विषाणूमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूमुळे कडक आरोग्य मार्गदर्शक सूचनांनुसार ऑलिंपियामध्ये (Olympia) टोकियो ऑलिम्पिक 2020 प्राचीन मशाल पेटविण्यात आली. हे खेळ पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार होतील असे आयोजकांनी सांगितले असून आयओसीने (IOC) असेही म्हटले आहे की खेळ पुढे ढकलल्याबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. या सोहळ्यात प्रेक्षकांना प्रतिबंधित करण्यात आले. प्राचीन ग्रीसच्या सर्वोच्च धार्मिक प्रतिनिधीच्या वेष परिधान केलेल्या एका युवतीने सूर्याची किरणांनी टॉर्च पेटविली. यासह ग्रीसमध्ये आठवडाभर होणाऱ्या टॉर्च रिलेला सुरुवात झाली आहे. ही मशाल 19 मार्च रोजी टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजकांना सोपवण्यात येईल.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाच यांनी भाषणात प्राचीन ऑलिम्पिकच्या ठिकाणी ग्रीक ऑलिम्पिक समिती अध्यक्ष यांचे आभार मानताना सांगितले की,"आजचा सोहळा तुम्ही कठीण परिस्थितीत देखील शक्य केल्याबद्दल आम्ही विशेष कृतज्ञ आहोत." सोमवारी ऑलिम्पिकचा सोहळा मर्यादित प्रेक्षकांशिवाय आयोजित केला जाण्याची घोषणा केली. पाहा ऑलिम्पिकची मशाल पेटवण्याचा सोहळ्यातील हा व्हिडिओ:
कोरोना विषाणूमुळे जगात सर्वत्र खेळाचा परिणाम होत असून 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान वेळापत्रकानुसार ऑलिम्पिक खेळ आयोजित होते की नाही याची भीती व्यक्त केली जात आहे. जपानने अखेर 1964 मध्ये या खेळांचे आयोजन केले होते.