Paris Olympics 2024 Time And Schedule: पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक, उद्याच पहिला सामना, संपूर्ण स्पर्धेची तारीख आणि वेळ घ्या नोट करुन
अगदी 100 वर्षांपूर्वी पॅरिसने शेवटचे ऑलिम्पिक आयोजित केले होते.
India's kit for Paris Olympics 2024 (Photo Credit - X)
Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा उद्घाटन समारंभ 26 जुलै रोजी आहे, परंतु भारताचा पहिला सामना 25 जुलै रोजी आयोजित केला जात आहे. 16 क्रीडा प्रकारातील 69 पदक स्पर्धांमध्ये सहभागी झालेले 117 भारतीय खेळाडू देशाला अभिमान वाटावा यासाठी मैदानात उतरतील. अगदी 100 वर्षांपूर्वी पॅरिसने शेवटचे ऑलिम्पिक आयोजित केले होते. 1924 च्या पॅरिसमधील खेळांमध्ये 44 देशांतील 3000 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता. पण आता हे ‘दिव्यांचे शहर’ सुमारे 10500 खेळाडूंचे आयोजन करण्यास तयार आहे. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात आतापर्यंत केवळ 35 पदके आहेत, ज्यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतातील 119 खेळाडू सहभागी झाले होते, ज्यांनी 7 पदके जिंकली होती. यामध्ये नीरज चोप्राने भालाफेकमध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक सुवर्णपदकाचा समावेश आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होईल?
पॅरिस ऑलिम्पिकचे थेट प्रक्षेपण Sports18 आणि DD Sports 1.0 वर उपलब्ध असेल, तर भारतात लाइव्ह स्ट्रीमिंग 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत JioCinema वर असेल. (हे देखील वाचा: Paris Olympics 2024: BCCI चे सचिव जय शाह यांची मोठी घोषणा; पॅरिस गेम्स 2024 साठी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला 8.5 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर )
पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे वेळापत्रक
दिनांक
खेळ
वेळ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
25 जुलै
तिरंदाजी (रँकिंग राऊंड)
दुपारी 1 वाजता
26 जुलै
—
—
27 जुलै
बॅडमिंटन (गट सामने)
दुपारी 12.50 पासून
रोईंग
दुपारी 12.30 पासून
शूटिंग
दुपारी 12.30 पासून
बॉक्सिंग (R32)
संध्याकाळी 7 पासून
हॉकी (भारत विरुद्ध न्यूझीलंड)
रात्री 9 वाजता
टेबल टेनिस
संध्याकाळी 6.30 पासून
टेनिस (R1)
संध्याकाळी 5.30 पासून
28 जुलै
तिरंदाजी (टीम मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
बॅडमिंटन
दुपारी 12.00 पासून
बॉक्सिंग (R32)
दुपारी 2.46 पासून
रोईंग
दुपारी 1.06 पासून
शुटिंग (मेडल मॅच)
दुपारी 1.06 पासून
पोहणे
दुपारी 2.30 पासून
टेबल टेनिस (R62)
दुपारी 1.30 पासून
टेनिस (R1)
दुपारी 3.30 पासून
29 जुलै
तिरंदाजी (टीम मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
बॅडमिंटन
दुपारी 1.40 पासून
हॉकी (भारत विरुद्ध अर्जेंटिना)
दुपारी 4.15 वाजता
रोईंग
दुपारी 1 पासून
शूटिंग
दुपारी 12.45 पासून
टेबल टेनिस (R32)
दुपारी 1.30 पासून
टेनिस (R2)
30 जुलै
पोहणे (मेडल मॅच)
मध्यरात्री 12.52 वाजता
तिरंदाजी
दुपारी 3.30 पासून
बॅडमिंटन
दुपारी 12.00 पासून
बॉक्सिंग
दुपारी 02.30 पासून
अश्वारोहण
दुपारी 02.30 पासून
हॉकी (भारत विरुद्ध आयर्लंड)
संध्याकाळी 4.45 वाजता
रोईंग
दुपारी 1.40 पासून
शूटिंग (मेडल मॅच)
दुपारी 1.00 पासून
टेबल टेनिस (R32)
दुपारी 1 पासून
टेनिस (R2)
दुपारी 3.30 पासून
1 ऑगस्ट
तिरंदाजी
दुपारी 1 पासून
अॅथलेटिक्स
रात्री 11 पासून
बॅडमिंटन
दुपारी 12 पासून
बॉक्सिंग
दुपारी 3.30 पासून
गोल्फ
दुपारी 12.30 पासून
हॉकी (भारत विरुद्ध बेल्जियम)
दुपारी 03.30 वाजता
रोईंग
दुपारी 1.20 पासून
सेलिंग
दुपारी 3.30 पासून
शुटिंग (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
टेबल टेनिस
दुपारी 1.30 पासून
टेनिस
दुपारी 3.30 पासून
2 ऑगस्ट
तिरंदाजी
दुपारी 1 पासून
अॅथलेटिक्स
रात्री 9.30 पासून
बॅडमिंटन (उपांत्य फेरी)
दुपारी 12 पासून
बॉक्सिंग
संध्याकाळी 7 पासून
गोल्फ
दुपारी 12.20 पासून
हॉकी (भारत वि ऑस्ट्रेलिया)
संध्याकाळी 4.45 वाजता
ज्युडो (मेडल मॅच)
दुपारी 1.30 पासून
रोईंग (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
सेलिंग
दुपारी 3.30 पासून
शुटिंग
दुपारी 12.30 पासून
टेबल टेनिस (उपांत्य फेरी)
दुपारी 1.30 पासून
टेनिस (मेडल मॅच)
दुपारी 3.30 पासून
3 ऑगस्ट
तिरंदाजी (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
अॅथलेटिक्स (शॉट पुट फायनल)
रात्री 11.05 वाजता
बॅडमिंटन (मेडल मॅच )
दुपारी 12 पासून
बॉक्सिंग
संध्याकाळी 7.32 पासून
गोल्फ
दुपारी 12.30 पासून
रोईंग (मेडल मॅच)
दुपारी 1.12 पासून
सेलिंग
दुपारी 3.30 पासून
शूटिंग (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)
संध्याकाळी 5 पासून
टेनिस (मेडल मॅच)
वेळ निश्चित नाही
4 ऑगस्ट
तिरंदाजी (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
अॅथलेटिक्स
दुपारी 3.35 पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)
दुपारी 12 पासून
बॉक्सिंग (उपांत्यपूर्व/उपांत्य फेरी)
दुपारी 2.30 पासून
अश्वारोहण (अंतिम फेरी)
दुपारी 1.30 वाजता
गोल्फ (मेडल मॅच)
दुपारी 12.30 वाजता
हॉकी (उपांत्यपूर्व फेरी)
दुपारी 1.30 पासून
सेलिंग
दुपारी 3.30 पासून
शुटिंग (अंतिम फेरी)
दुपारी 12.30 पासून
टेबल टेनिस (मेडल मॅच)
संध्याकाळी 5 पासून
5 ऑगस्ट
अॅथलेटिक्स (5 किमी अंतिम फेरी)
रात्री 10.34 पासून
बॅडमिंटन (मेडल मॅच)
दुपारी 1.15 पासून
सेलिंग
दुपारी 3.30 पासून
शूटिंग (अंतिम फेरी)
दुपारी 1 वाजता
टेबल टेनिस
दुपारी 1.30 पासून
कुस्ती
संध्याकाळी 6.30 पासून
6 ऑगस्ट
अॅथलेटिक्स (लांब उडी अंतिम फेरी)
दुपारी 1.50 पासून
बॉक्सिंग (उपांत्य फेरी)
दुपारी 2 पासून
हॉकी (उपांत्य फेरी)
संध्याकाळी 3.30 पासून
सेलिंग (मेडल मॅच)
दुपारी 3.30 पासून
टेबल टेनिस
दुपारी 4 पासून
कुस्ती (मेडल मॅच)
दुपारी 2.30 पासून
7 ऑगस्ट
अॅथलेटिक्स (3 किमी अडथळा शर्यत अंतिम फेरी)
सकाळी 11 पासून
बॉक्सिंग
रात्री 1 पासून
गोल्फ
दुपारी 12.30 वाजता
सेलिंग
सकाळी 11 वाजता
टेबल टेनिस
दुपारी 1.30 वाजता
वेटलिफ्टिंग (49 किलो वजनी गट अंतिम फेरी)
रात्री 11 वाजता
कुस्ती (मेडल मॅच)
दुपारी 2.30 वाजता
8 ऑगस्ट
अॅथलेटिक्स (भालाफेक अंतिम फेरी)
दुपारी 1.35 पासून
गोल्फ
दुपारी 12.30
हॉकी (मेडल मॅच)
संध्याकाळी 5.30 पासून
टेबल टेनिस
दुपारी 1.30 पासून
कुस्ती
दुपारी 2.30 पासून
9 ऑगस्ट
बॉक्सिंग (अंतिम फेरी)
दुपारी 1.32 पासून
अॅथलेटिक्स (मेडल मॅच)
दुपारी 2.10 पासून
गोल्फ
दुपारी 12.30 वाजता
हॉकी (मेडल मॅच)
दुपारी 2 वाजता
कुस्ती (मेडल मॅच)
दुपारी 2.30 वाजता
11 ऑगस्ट
बॉक्सिंग (मेडल मॅच)
दुपारी 1 पासून
कुस्ती (मेडल मॅच)
दुपारी 2.30 पासून