PV Sindhu ने अखेर संपवला 2 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ, मालविका बनसोडवर मात करत बनली सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनल 2022 चॅम्पियन

अव्वल मानांकित सिंधूने मालविकाचा 35 मिनिटांत 21-13, 21-16 असा पराभव करून सुपर 300 चे विजेतेपद पटकावले. 2019 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेत्या मोहिमेनंतर दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियनचे पहिले विजेतेपद आहे.

पीव्ही सिंधू (Photo Credit: PTI)

पीव्ही सिंधूने (PV Sindhu) रविवारी सय्यद मोदी इंडिया इंटरनॅशनलच्या (Syed Modi International) महिला एकेरीच्या फायनलमध्ये 20 वर्षीय देशबांधव मालविका बन्सोडला (Malvika Bansod) नमवून धडक कामगिरी केली. अव्वल मानांकित सिंधूने बाबू बनारसी दास इनडोअर स्टेडियमवर मालविकाचा 35 मिनिटांत 21-13, 21-16 असा पराभव करून सुपर 300 चे विजेतेपद पटकावले. 2019 मध्ये ग्लासगो येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिप सुवर्णपदक विजेत्या मोहिमेनंतर दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियनचे पहिले विजेतेपद आहे.



संबंधित बातम्या