Wimbledon 2019: सेरेना विल्यम्सला धक्का; सिमोना हेलेप ला विंबलडनचे जेतेपद

माजी नंबर 1 टेनिसपटू आणि रोमानियाची सिमोना हेलेप हिने सेरेना विल्यम्सचा 6-2, 6-2 असा पराभव करत विंबलडनचे यंदाचे जेतेपद मिळवले आहे. आपल्या टेनिस करिअरमधील हेलेपचे हे दुसरे ग्रँड स्लॅप जेतेपद आहे.

सिमोना हेलेप (Photo Credit: Wimbledon/Twitter)

अमेरिकेची महान टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) हिचे आठवे विंबलडन (Wimbledon) जेतेपद जिंक्यचे स्वप्न भंग झाले आहेत. माजी नंबर 1 टेनिसपटू आणि रोमानियाची  सिमोना हेलेप (Simona Halep) हिने सेरेनाचा 6-2, 6-2 असा पराभव करत विंबलडनचे यंदाचे जेतेपद मिळवले आहे. आपल्या टेनिस करिअरमधील हेलेपचे हे दुसरे ग्रँड स्लॅप जेतेपद आहे. याआधी हेलेप 2018 मध्ये फ्रेंच ओपन जिंकत पहिला ग्रँड स्लॅम जेतेपद आपल्या नावावर केले. सेमीफायनलमध्ये हालेपने आठव्या मानांकित एलिना स्विटोलिना हिला सरळ सेटमध्ये पराभूत करत विंबलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विंबलडनच्या अंतिम फेरीत पोहचनरी हालेप पहिली रोमेनिया टेनिसपटू आहे. सातवे मानांकन मिळालेली हालेप 2014 नंतर प्रथमच विंबलडनच्या सेमीफाइनलमध्ये खेळली. (Wimbledon 2019: अँडी मरे यांना सन्मानित करण्यासाठी विंबलडन आयोजक बांधणार पुतळा)

दरम्यान, आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिल्यावर सेरेनाचे हे तिसरे ग्रँड स्लॅम फायनल होते. याआधी सेरेना 2018 मध्ये विम्बल्डन आणि त्यानंतर यूएस ओपन टेनिस स्पर्धेचे फायनल गाठले. सेरेनाने 2017मध्ये आपली लेक एलेक्सिस ओलंपिया ओहानियन जूनियर (Alexis Olympia Ohanian, Jr) हिला जन्म दिला.

यंदाचे विंबलडनचे विजेतेपद मुक्तच सेरेनाने मार्गारेट कोर्ट हिच्या रेकॉर्ड 24 ग्रँड स्लॅम ट्रॉफीची बरोबर करण्याची संधी पुन्हा एकदा गमावली. सेरेनाने आजवर महिला एकेरीचे  23 ग्रँड स्लॅम जेते पद मिळवली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now