Footballer Sex With 10,000 Women: 'मी दहा हजार महिलांसोबत केला आहे सेक्स'; लोकप्रिय फुटबॉलर Benjamin Mendy चा धक्कादायक खुलासा
पोलिसांनी मेंडीची चौकशी केली असता, त्याने बलात्काराचे सर्व आरोप फेटाळून लावले. यासोबतच मेंडीने कबूल केले की, त्याचे आतापर्यंत 10,000 महिला आणि मुलींशी शारीरिक संबंध झाले आहेत.
मोठे खेळाडू हे अनेक लोकांसाठी आदर्श असतात. अनेक लोकांना किंवा चाहत्यांना आपल्या आदर्श खेळाडूंसारखे व्हायचे असते. मात्र अशा खेळाडूंचे नकारात्मक कारनामे समोर आल्यावर पेच निर्माण होतो. आता एका दिग्गज खेळाडूने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. मँचेस्टर सिटीचा माजी फुटबॉलपटू बेंजामिन मेंडीने (Benjamin Mendy) दावा केला आहे की, त्याने 10,000 महिलांसोबत सेक्स केला आहे. अनेक ब्रिटीश माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे.
मेंडी याच्यावर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पुन्हा खटला सुरू आहे. आता त्याच्या या सेक्सबद्दलच्या खुलाशामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. मेंडी याआधीही बलात्कार आणि लैंगिक छळाच्या अनेक प्रकरणांमधून बाहेर आला आहे.
मेंडी सध्या 28 वर्षांचा आहे. त्याच्यावर आधीच सुरू असलेले दोन बलात्काराचे खटले कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचत नसल्यामुळे, ही दोन्ही प्रकरणे पुन्हा सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आली आहेत. एलबीसीने मेंडीशी संबंधित सर्व खळबळजनक बातम्यांबाबत सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2020 मध्ये मेंडीने त्याच्या चेशायर बंगल्यात एका महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी पीडितेचे वय 24 वर्षे होते. त्याच्या दोन वर्षांपूर्वी एका 29 वर्षीय महिलेने मेंडीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, या दोन्ही प्रकरणांमध्ये मेंडीने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.
चेस्टर क्राउन कोर्टातील खटल्याच्या वेळी, न्यायाधीश स्टीफन एव्हरेट यांनी ज्युरीला सांगितले की, फ्रेंच आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मेंडी या वर्षी जानेवारीमध्ये संपलेल्या खटल्यादरम्यान दोषी आढळला नाही. त्यामुळे बलात्काराच्या सहा आणि लैंगिक छळाच्या चार प्रकरणांतून त्याची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता झाली. इतर दोन प्रकरणांमध्ये (एक बलात्कारासाठी आणि दोन पीडितांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल), न्यायाधीश अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच प्रकरणांमध्ये मेंडीविरोधात पुन्हा खटला सुरू करावा लागणार आहे. (हेही वाचा: European Sex Championships: क्रोएशियाची Pornstar Sweet Mery ठरली युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपची विजेती; जाणून घ्या किती मिळाली रक्कम)
कोर्टात मेंडीविरुद्ध सादर केलेल्या केसनुसार, ‘मुलीने नकार दिल्यानंतरही मेंडीने तिला पकडून आपल्या बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारची आणखी एक घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, पोलिसांनी मेंडीची चौकशी केली असता, त्याने बलात्काराचे सर्व आरोप फेटाळून लावले. यासोबतच मेंडीने कबूल केले की, त्याचे आतापर्यंत 10,000 महिला आणि मुलींशी शारीरिक संबंध झाले आहेत. मात्र त्याने कधीही कोणाशीही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले नाहीत. मेंडीचा मँचेस्टर सिटीसोबतचा करार शनिवारी संपला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)