Wimbledon 2019: नोवाक जोकोविच विरुद्ध विंबलडन फायनल आधी रोजर फेडरर-अरबाज खान मिम्स सोशल मीडियावर वायरल
नोवाक जोकोविच विरुद्ध विंबलडन फायनल आधी 'स्विस किंग' म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडचा महान टेनिसपटू रोजर फेडरर आणि अरबाज खान यांचे मिम्स सोशल मीडियावर वायरल होत आहे.
'स्विस किंग' म्हणून ओळखला जाणारा स्वीत्झर्लंडचा महान टेनिसपटू रोजर फेडरर (Roger Federer) ने स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदाल (Rafael Nadal) ला नमवून विंबलडन (Wimbledon) च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फेडरर 12 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. सेमीफाइनलमध्ये सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत फेडररने नदालचा 7-6, 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याची टक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा गतविजेता नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) याच्याशी होणार आहे. रोजरने आजवर तब्बल आठ विंबलडन ग्रँड स्लॅम पटकावले आहेत. त्यामुळे आज तो आपले रेकॉर्ड आठवे विंबलडन स्लम जिंकतो कि नाही यावर सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण या सामन्याआधी स्विस किंगला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. (Wimbledon 2019: सेरेना विल्यम्सला धक्का; सिमोना हेलेप ला विंबलडनचे जेतेपद)
मागील काही वर्षांपासून फेडरर याची बॉलीवूड अभिनेता आणि 'दबंग' सलमान खान याचा भाऊ अरबाज खान (Arbaaz Khan) याच्याशी त्याच्या सारखेपणासाठी तुलना केली जात आहे. आणि आता, विंबलडन फायनल आधी देखील फेडरर आणि अरबाज यांचे मिम्स सोशल मीडियावर वायरल होत आहे.
"अरबाज खानने विंबलडन फाइनलमध्ये रॉजर फेडररला प्रोत्साहित करण्यासाठी लंडनला प्रवास करावा" या यूजरने म्हटले
फेडररने आजवर सिंगल्सचे २० ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकले आहेत. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा फेडरर हा अव्वल टेनिसपटू आहे. राफेल नडालने १८ तर जोकोविचने १५ जिंकले असून हे दोघे क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)