Roger Federer Injury: रॉजर फेडररची 2020 मधील उर्वरित हंगामातून माघार, ट्विटरवरून दिली महत्त्वाची माहिती

एका ट्वीटमध्ये फेडररने म्हटले आहे की 2021 हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याची त्याला अपेक्षा आहे.

रॉजर फेडरर (Photo Credit: Getty)

ग्रँड स्लॅम इतिहासातील सर्वात यशस्वी टेनिसपटू रॉजर फेडररने (Roger Federer) उजव्या गुडघ्यावर आणखी एक आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया होणार असून आगामी हंगामातून माघार घेत असल्याचे जाहीर केले. एका ट्वीटमध्ये फेडररने म्हटले आहे की 2021 हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याची त्याला अपेक्षा आहे. फेडररने यापूर्वी फ्रेंच ओपन (French Open) स्पर्धेतून माघार घटण्याचे जाहीर केले होते, मात्र आता त्याला यंदाच्या हंगामातील अमेरिकन ओपन (US Open) स्पर्धेलाही मुकावे लागणार आहे. फेडररच्या उजव्या गुडघ्यावर लवकरच एक आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, त्यामुळे 2020 मधील उर्वरित हंगामातून त्याने माघार घेतली आहे. शिवाय, फेडरर थेट 2021 च्या हंगामातच टेनिस कोर्टवर परत असल्याची माहिती त्याने एका ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे. (रॉजर फेडरर याने 5 वर्षात चौथ्यांदा फ्रेंच ओपनमधून घेतली माघार, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट, पाहा)

फेडररने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये एक फोटो पोस्ट केला आणि दुखापती संदर्भातील माहिती दिली. काही दिवसांपूर्वी अचानक गुडघ्याच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यामुळे लवकरात लवकर उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून घेणं क्रमप्राप्त आहे. 2017 च्या हंगामात मी जे केलं तसं आताही मला करावं लागणार आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे तंदुरूस्त होऊन थेट 2021 च्या हंगामातच मी पुन्हा टेनिस कोर्टवर उतरेन, असे फेडररने स्पष्ट केले.

दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला नोवाक जोकोविचकडून ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनल सामन्यात फेडररला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांनतर यावर्षी इतर कोणतेही ग्रँड स्लॅम स्पर्धा झाली नाही कारण मार्चमध्ये कोरोना व्हायरसमुळे सर्व टेनिस सामने आणि टूर्नामेंट स्थगित करण्यात आले होते. 20 ग्रँड स्लॅमसह फेडरर व्यावसायिक टेनिसच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पुरुष खेळाडू आहे. त्याचे मोठे प्रतिस्पर्धी राफेल नडाल आणि जोकोविच अनुक्रमे 19, 17 ग्रँड स्लॅमसह त्याच्या मागे आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif