राफेल नडाल याने मोडला रॉजर फेडरर याचा सर्वाधिक ATP Masters 1000 समाने जिंकण्याचा विक्रम, Rogers Cup च्या क्वार्टरफायनलमध्ये धडक
रॉजर्स कपमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात नडलने एटीपी मास्टर्स 1000 मध्ये फेडररचा 378 विजयांचा विक्रम मोडला. नडालने आजवर 379 एटीपी मास्टर्स सामने जिंकले आहेत.
क्ले कोर्टचा राजा आणि 18ग्रँड स्लॅम जेता राफेल नडाल (Rafael Nadal) याने आपल्या प्रतिस्पर्धी आणि 20 ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडरर (Roger Federer) याचा सर्वाधिक एटीपी मास्टर्स (ATP Masters) सामने जिंकण्याचा विक्रम मोडला आहे. रॉजर्स कपमध्ये (Rogers Cup) रॉडो पेलाविरुद्ध विजय मिळवत नडालने फेडररचा एटीपी मास्टर्स 1000 मध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम मोडला. रॉजर्स कपमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात नडलने एटीपी मास्टर्स 1000 मध्ये फेडररचा 378 विजयांचा विक्रम मोडला. नडालने आजवर 379 एटीपी मास्टर्स सामने जिंकले आहेत. नडालने पेलाला 6-3, 6-4 असे सलग दोन सेटमध्ये पराभूत केले. याचबरोबर त्याने रॉजर्स कपच्या क्वार्टरफायनलमध्ये नवव्यांदा धडक मारली.
सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आता नडालची लढत शुक्रवारी इटलीच्या फॅबियानो फोगिनीनी (Fabiano Fognini) याच्याशी होईल. फोगिनीनीने फ्रान्सच्या सातव्या मानांकित अॅड्रियन मन्नारिनोचा 6-2, 7-5 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
दरम्यान, मागील तीनही सामने गिडोविरूद्ध सरळ सेटमध्ये जिंकल्यामुळे संपूर्ण सामन्यात त्याचे संपूर्ण नियंत्रण होते. 18 ग्रँड स्लॅम चॅम्पियन नडालला अवघ्या 1 तास 47 मिनिटांत सामना जिंकण्यात त्रास झाला नाही. त्यानंतर नडालने सेट व सामना दोन्ही जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि एटीपी मास्टर्स 1000 मध्ये फेडररचा सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रमही मोडला.