BWF World Championship 2019: पीव्ही सिंधू हीचा संघर्षपूर्ण विजय, Tai Tzu Ying हिला पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश
सिंधूने ताईचा 12-21, 23-21, 21-19 असा पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात ताईसमोर सुरुवातीपासून सिंधूला संघर्ष करावा लागला.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिने चिनी तैपेई ताई त्ज़ू-यिंग (Tai Tzu Ying) हीचा तीन गेममध्ये पराभव करत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. सिंधूने ताईचा 12-21, 23-21, 21-19 असा पराभव केला. अटीतटीच्या या सामन्यात ताईसमोर सुरुवातीपासून सिंधूला संघर्ष करावा लागला. पहिला गेम सिंधूने 12-21 असा गमावला. शिवाय दुसऱ्या गेममध्ये देखील ती पराभवाच्या उंबरठ्यावर होती, पण तिने शांत राहत चांगले शॉट्स मारले आणि दुसरा गेम जिंकला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी सिंधूनेच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. दोन सलग रौप्यपदके पटकावणाऱ्या या ऑलिम्पिकपदक विजेतीने या स्पर्धेत दोन ब्राँझपदकेदेखील पटकावली आहेत. मात्र तिला एकदाही सुवर्णपदक पटकावता आले नाही.
दरम्यान, सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकाच्या यिंगविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीतील सामान एक तासा 11 मिनिटांत जिंकला. पहिल्या सेटमध्ये सिंधूला अवघ्या 15 मिनिटांत पराभवाचा सामना करावा लागला. पण, तिने दुसर्या गेनमध्ये विजयासाठी जोरदार पुनरागमन केले. शेवटच्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. एका वेळी चिनी खेळाडू आघाडीवर होती पण त्यानंतर सिंधूने शेवटच्या वेळी सर्वोत्कृष्ट खेळ दाखविला आणि सेटसह गेमही जिंकला.
या विजयासह सिंधूने सलग तिसर्या वर्षी आणि सलग पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूने 2017 आणि 2018 मध्ये रौप्य आणि 2013 आणि 2014 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.