Korea Open मध्ये पीव्ही सिंधू चे आव्हान संपुष्टात; दुसऱ्या फेरीत यूएसएच्या बेईवेन झांगकडून पराभव, साई प्रणित जखमी
सिंधूला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झांगविरुद्ध 21-7, 22-24, 15-21 असा पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुष एकेरीत बी साई प्रणित याने पहिल्या मॅचच्या दुसऱ्या गेमदरम्यान दुखापतीमुळे माघार घेतली.
विश्वविजेतेपद जिंकून इतिहास रचणार्या भारतीय महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) चे कोरिया ओपन (Korea Open) मधील आव्हान संपुष्टात आले आहे. सिंधूला दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या बेईवेन झांग (Beiwen Zhang) विरुद्ध 21-7, 22-24, 15-21 असा पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या फेरीतील मॅचमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पायाला मिळाली. मागील महिन्यात स्वित्झर्लंडच्या बासेल येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सिंधूने इतिहास रचला होता. सुरुवातीच्या फेरीत बाद होण्याचा सिंधूची ही दुसरी वेळ आहे. काही वेळ पूर्वी सिंधू चायना ओपनच्या पहिल्या फेरीतच होऊन बाहेर पडली होती. (पीव्ही सिंधू ला मोठा धक्का; विश्व चॅम्पियन बनवणाऱ्या कोचने सोडली साथ, हे आहे कारण)
सिंधूनेझांगविरुद्ध मॅचला दमदारपणे सुरुवात केली आणि पहिला गेम 21-7 असा जिंकला. दुसऱ्या गेमदरम्यान दोंघांमध्ये चांगलीच झुंज पाहायला मिळाली. सिंधूने जोरदार लढा दिला पण अखेरीसझांगने दुसरा गेम 24-22 असा जिंकला आणि मॅचमध्ये बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्येझांगने धर्य बनवून ठेवले आणि 21-15 ने सेटसह मॅच जिंकली. दुसरीकडे, सिंधूआधी पुरुष एकेरीत बी साई प्रणित याने पहिल्या मॅचच्या दुसऱ्या गेमदरम्यान दुखापतीमुळे माघार घेतली. प्रणितने माघार घेतल्याने जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील अँडर्स अँटोनसेन याला पुढल्या फेरीत सरशी मिळाली. साई प्रणितने पहिले गेम 9-21 असा गमावला तर दुसऱ्या गेममध्ये तो 7-11 असा पिछाडीवर होता. यानंतर त्याला दुखापत झाली आणि त्या;या सामना मध्येच सोडावा लागला.
पाचव्या मानांकित सिंधूनेकारकीर्दीतिल मागील आठ सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत 11 व्या झांगचा पराभव केला आहे. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील तिने झांगचा पराभव केला. पण, यंदा यूएसएची खेळाडू सिंधूच्या वरचढ झाली आणि मागील आठ मॅचमधील पराभवाचा सूड घेतला. 26 वर्षीय सिंधूने 2017 मध्ये कोरिया ओपनचे विजेतेपद जिंकले होते.