Maharahstra Kesari 2025: पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, चित्तथरारक लढतीत महेंद्र गायकवाडचा केला पराभव
अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर (Mahendra Gaikwad) भारी पडला आणि सामना जिंकला. पृथ्वीराज मोहोळ 67 व्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
Maharahstra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ (Pruthviraj Mohol) आणि सोलापुरचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात सामना रंगला. सलग दुसर्या वर्षी महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला होता. अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळ हा महेंद्र गायकवाडवर (Mahendra Gaikwad) भारी पडला आणि सामना जिंकला. पृथ्वीराज मोहोळ 67 व्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता ठरला.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ
पैलवान पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात उपांत्य फेरीचा कुस्तीचा सामना रंगला होता. मात्र, पैलवान पृथ्वीराज मोहोळकडून शिवराज राक्षे पराभूत झाला. पण पराभूत होताच शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मैदानात काहीवेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. मात्र, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाद काहीसा निवाळला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते.