Pro Kabaddi League 2019: Telgu Titans विरुद्ध UP Yoddha मध्ये झाली टाय, U Mumba ची विजयी खेळी

दुसरी लढत यु मुंबा (U Mumba) विरुद्ध फॉर्च्युन जायंट्स (Fortune Giants) यांच्यामध्ये मुंबईतील सरदार वल्लभ भाई पटेल इंडिओर स्टेडिअमवर खेळवण्यात आली.

Pro Kabaddi 7 (Photo Credits-Twitter)

प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League2019) सातव्या सीझनमध्ये आज पहिली लढत तेलगू टायटन्स (Telgu Titans) विरुद्ध युपी योद्धा (UP Yoddha ) यांच्यामध्ये पाहायला मिळाली. दुसरी लढत यु मुंबा (U Mumba) विरुद्ध फॉर्च्युन जायंट्स (Fortune Giants) यांच्यामध्ये मुंबईतील सरदार वल्लभ भाई पटेल इंडिओर स्टेडिअमवर खेळवण्यात आली. तर 31 जुलैला रंगलेल्या सामन्यात यु मुंबा संघाचा पराभव झाला. तर युपी योद्धा संघाचा विजय झाला होता.

मात्र आज झालेल्या सामन्यात युपी योद्धा आणि तेलगू टायटन्स संघामध्ये चुरशीचा सामना रंगला. तसेच दोन्ही संघाने उत्तम खेळी करत सामना 20-20 अशा गुणांनी बरोबरीचा झाला. त्याचसोबत तेलगूच्या संघातील सिद्धार्थ देसाई या खेळाडूने जबरदस्त कामगिरी करत 5 रेड टाकत संघाला 5 गुण एकट्याने मिळवून दिले. तसेच फरहाद, अबोझर, सुरज देसाई यांची सुद्धा खेळी उत्तम दिसून आली.(Pro Kabaddi League 2019: UP Yoddha च्या पारड्यात यंदाचा पहिला विजय, U-Mumba चा घरच्या मैदानात पराभव)

दुसऱ्या फेरीत झालेल्या लढतीत यु मुंबा विरुद्ध फॉर्च्युन जायंट्स संघ सुद्धा तगडे असून खेळाडूंनी विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.  परंतु फॉर्च्युनच्या संघाला हरवत अखेर यु मुंबा संघाने आजच्या सामन्यात विजय मिळवला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif