Pro Kabaddi League 2019: UP Yoddha च्या पारड्यात यंदाचा पहिला विजय, U-Mumba चा घरच्या मैदानात पराभव
प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League2019) सातव्या सीझनमध्ये आज, यु- मुंबा विरुद्ध यु पी योद्धा अशी दुसरी लढत पाहायला मिळाली. खेळाच्या सुरवातीपासूनच दोन्ही संघामध्ये इतका अटीतटीचा सामना रंगला होता अगदी मोक्याच्या क्षणी 4 पॉइंट्सची लीड घेऊन युपी योद्धाने 27-23 अशा फरकाने विजय आपल्या नावी केला.
प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League2019) सातव्या सीझनमध्ये आज, यु- मुंबा (U Mumba) विरुद्ध यु पी योद्धा (UP Yoddha) अशी दुसरी लढत पाहायला मिळाली. खेळाच्या सुरवातीपासूनच दोन्ही संघामध्ये इतका अटीतटीचा सामना रंगला होता की शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचा विजय होईल हे सांगणे कठीण होते. मात्र अगदी मोक्याच्या क्षणी 4 पॉइंट्सची लीड घेऊन युपी योद्धाने 27-23 अशा फरकाने विजय आपल्या नावी केला. यासोबतच यंदाच्या सीझन मधील युपीच्या संघाचा हा पहिला विजय सुद्धा ठरला आहे. तर दुसरीकडे यु मुंबाला स्वतःच्याच होमग्राउंडवर पराभव पत्करावा लागला आहे. Pro Kabaddi League 2019: Jaipur Panthers संघाने Haryana Steelers ला धूळ चाखवत साधली विजयी हॅट्रिक, चाहते म्हणतात बिग बी ठरले लकीचार्म
दरम्यान आतापर्यंत दोन्ही संघाच्या परफॉर्मन्सची तुलना केल्यास पाच पैकी 3 सामन्यांमध्ये विजयप्राप्त झालेली यु मुंबा टीम पॉईंट टेबल मध्ये तिसऱ्या स्थानी आहे तर आजच्या सामन्यातील पहिल्या विजयनानंतर युपी योद्धा 5 पॉईंट्स मिळवून दहाव्या स्थानी विराजमान झाले आहेत. आजही पहिल्या 20 मिनिटांच्या खेळीत दोन्ही संघांमध्ये अवघ्या 2 फरक होता मात्र तरीही खेळाच्या उत्तार्धात आपली लीड वाढवून युपी योद्धांनी खेळाला कलाटणी दिली.
That first win waala feeling! 😍@UpYoddha get off the mark and notch up a 27-23 victory in #VIVOProKabaddi Season 7 tonight.
Were you a part of all the action on Star Sports & Hotstar? #IsseToughKuchNahi #MUMvUP
— ProKabaddi (@ProKabaddi) July 31, 2019
The Sultan almost turned #MUMvUP around in the dying moments but a stray foot beyond the line ensures @UpYoddha win a thriller of a game! 🔥
For all the LIVE #VIVOProKabaddi action, keep watching Star Sports and Hotstar. #IsseToughKuchNahi pic.twitter.com/rDmxcxUXEi
— ProKabaddi (@ProKabaddi) July 31, 2019
दुसरीकडे आज जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) विरुद्ध हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) हा एकतर्फी सामना मुंबईमध्ये पार पडला. यामध्ये सुरुवातीपासुनच पँथर्सनी आपले वर्चस्व बनवून ठेवले होते तर सामन्याअंती 37- 21 अशा पॉइंट्सच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर सलग तीन खेळांमध्ये लागोपाठ विजय मिळवण्याचा मान सुद्धा पँथर्सना मिळाला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 31, 2019 10:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

