Pro Kabaddi League 2019: गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाचा यूपी योद्धा संघावर 44-19 ने एकतर्फी विजय

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील 10 वा सामना गुजरात फॉर्च्यूनजायंट्स आणि यूपी योद्धा यांच्यात हेद्राबादमधील गाचीबावली इंडोर स्टेडिअमवर रंगला.

Gujarat Fortunegiants (Photo Credits: Twitter)

प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सीजनमधील 10 वा सामना गुजरात फॉर्च्यून जायंट्स (Gujarat Fortune Giants) आणि यूपी योद्धा (UP Yoddha) यांच्यात हेद्राबादमधील गाचीबावली इंडोर स्टेडिअमवर रंगला. या एकतर्फी सामन्यात गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाने यूपी योद्धा संघावर 44-19 ने मात केली.

गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर यूपी योद्धा संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. यूपीच्या संघाला पहिल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने 17-48 ने हरवले होते. तर गुजरात संघाने पहिल्या सामन्यात बंगलोर बुल्स संघाचा 42-24 ने पराभव केला होता.

प्रो कबड्डी ट्विट:

या सामन्यात गुजरात फॉर्च्यून जायंट्स संघाकडून रोहित गुलियाने जबरदस्त कामगिरी करत एकूण 11 गुण मिळवले, तर स्वतःच्या करिअरमधील पहिला सुपर 10 मिळवला. याशिवाय सचिन तंवर आणि प्रवेश भैन्सवाल यांनी प्रत्येकी 6-6 गुण मिळवले.

यूपी योद्धा संघांचा कोणताच खेळाडू चांगली कामगिरी करु शकला नाही. यूपी योद्धाकडून सर्वात जास्त गुण (5) श्रीकांत जाधवने मिळवले. यूपीचा स्टार खेळाडू मोनू गोयत या सामन्यात विशेष कामगिरी करु शकला नाही.

या विजयासह गुजरात फॉर्च्यून जायंट्स 10 पॉईंट्स सह स्पर्धेत पहिल्या स्थानावर पोहचली आहे. तर यूपी योद्धा शेवटच्या म्हणजेच 12 व्या स्थानावर आहे.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif