Paralympics 2024: मराठमोळ्या Sachin Khilari ने रचला इतिहास, गोळाफेकमध्ये 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह Silver Medal ची कमाई
पुरुषांच्या शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक जिंकले आहे. सचिनने 16.32 मीटर्सच्या थ्रो करत दुसरे स्थान पटकावले.
Paralympics 2024: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये आज 4 सप्टेंबरच्या दिवसाची सुरूवात मराठमोळ्या सचिन खिल्लारी (Sachin Khilari) याने शॉटपुट F46 प्रकारात रौप्य पदक (Silver Medal in Shot Put )जिंकत केली. सचिन खिलारी याने 16.32 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह रौप्यपदक पटकावले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्ट याने 16.38 मीटरच्या थ्रो ने सुवर्णपदक जिंकले. अवघ्या 00.06मीटरच्या फरकाने सचिनचे सुवर्णपदक हुकले. सचिनने दुसऱ्या प्रयत्नातच 16.32 मीटर गोळा फेकला होता. मात्र, त्या नंतरही त्याने प्रयत्न केले पण त्याला पुढे जाता आले नाही. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या स्थानावर राहिला तर रोहित कुमार नवव्या स्थानी होता.
34 वर्षीय सचिनने 16.32 मीटर गोळा फेकून स्वतःचा आशियाई विक्रम मोडला. जपानमध्ये मे २०२४ मध्ये झालेल्या जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने विक्रम केला होता. त्यामुळे भारताच्या पारड्यात 21 पदके झाली आहेत.
सचिन खिलारी याचे थ्रो
पहिला प्रयत्न 14.72 मीटर
दुसरा प्रयत्न 16.32 मीटर
तिसरा प्रयत्न 16.35 मीटर
चौथा प्रयत्न 16. 31 मीटर
पाचवा प्रयत्न 16.03 मीटर
आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता.
1984 नंतर भारताला गोळाफेकमध्ये पदक मिळवून दिलं
सचिन खिलारी याचा इतिहास
सचिन सर्जेराव खिलारी हा सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील करगणी गावचा आहे. तो 9 वर्षांचा असताना सायकवरून पडला. यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला. यानंतर गँगरीनमुळे त्याच्या डाव्या हाताच्या हालचालींवर मर्यादा आली. सचिनच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या 21 झाली आहे. रौप्य पदकाच्या कामगिरी सह सचिन खिल्लारे याने नवा रेकॉर्ड बनवला. 40 वर्षांत पॅरालिम्पिक शॉट-पुट पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वी 1984 मध्ये भारताने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये पहिले पदक जिंकले होते.