Neeraj Chopra Wins Silver: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने जिकलं रौप्यपदक
संपूर्ण भारतीयाच्या नजरा नीरज चोप्रावर होत्या. नीरज चोप्राने आज नवा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले आहे.
Neeraj Chopra Wins Silver: पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) च्या अंतिम टप्प्यात आज भारताने नाव कोरले आहे. संपूर्ण भारतीयाच्या नजरा नीरज चोप्रावर होत्या. नीरज चोप्राने आज नवा इतिहास रचला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले आहे. पुरुष भालाफेकीचा अंतिम सामना पॅरिसमध्ये 8 ऑगस्ट रात्री (11.45) नंतर हा खेळ झाला. भालाफेक स्पर्धेत नीरजने रौप्यपदकाला मिळाले. (हेही वाचा- कुस्तीपटू अमन सेहरावतने उपांत्य फेरी गाठली, अल्बानियाच्या रेसलरचा केला पराभव)
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आता 5 पदके जिंकली आहेत. भालाफेरच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न फाऊल घोषित करण्यात आला. दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्राने 89.45 मीटर फेकला. नीरज चोप्राची ही थ्रो सर्वोत्तम माणली जाते. या आधी त्याने 89.34 मीटर अंतरा पर्यंत भाला फेकला होता.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर पर्यंत भाला फेकला आणि त्याला गोल्ड मेडल पटकावलं. प्रत्येक खेळाडूला एकुण 6 वेळा भालाफेक करण्याची संधी मिळाली. नीरज चोप्रा आता ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदके जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. गेल्या ऑलिम्पिकपासून नीरज चोप्राने संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. यंदाच्या ऑल्मिपिकमध्ये नीरज चोप्राने सलग चार प्रयत्न फाऊल घोषित करण्यात आले.