Mumbai Rains: भारतीय हॉकी खेळाडू युवराज वाल्मिकीच्या घरी घुसले पाणी; व्हिडिओ पोस्ट करून मदतीची हाक (Watch Video)

युवराजने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो आपल्या घराच्या ड्रॉईंग रूममधून घोट्याच्या पातळीचे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

भारतीय हॉकी खेळाडू युवराज वाल्मिकीच्या घरी घुसले पाणी (Photo Credits: Twitter|@YWalmiki)

मुंबईतील मुसळधार (Mumbai Rains) पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हॉकी स्ट्रायकर युवराज वाल्मिकीला (Yuvraj Walmiki) बुधवारी सनी मुंबईकरांप्रमाणे अडचणीचा सामना करावा लागला. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने नागरिकांची चांगली तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी अडीच ते तीन फूट पाणी भरल्याच पाहायला मिळालं आणि याच साचलेल्या पचण्याचा आंतरराष्ट्रीय खेळाडूलाही सामना करावा लागला. युवराजने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो आपल्या घराच्या ड्रॉईंग रूममधून घोट्याच्या पातळीचे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 28 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये युवराजने बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) तसेच महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याकडून मदत मागितली. मुंबई महानगर क्षेत्रात ‘अति मुसळधार’ पावसाचा इशारा देण्यात आल्याने आयएमडीकडून रेड अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. 24 तासांपेक्षा जास्त दिवस सरी कोसळत राहिल्याने जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. (Mumbai Rain Updates: मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे डीवाय पाटील स्टेडियमचा बराचसा भाग कोसळला, Wankhede Stadium लाही बसला फटका See Photo)

30 वर्षीय युवराज नेदरलँड्समधील हेग येथे 2014 वर्ल्डकपमध्ये खेळलेल्या भारतीय संघाचा सदस्य होता. 2011 हॉकी आशिया चषक स्पर्धेत युवराजच्या गोलनं भारताला पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता. त्या स्पर्धेत भारतीय टीमने अजिंक्यपद मिळवले होते. डिफेंडर म्हणून त्याचा भाऊ दविंदर वाल्मिकी यांनीही भारताचे प्रतिनिधित्व करतो.

दुसरीकडे, मुंबई आणि आसपासच्या शहरांना जोरदार पावसाचा फटका बसला. नवी मुंबई आणि आसपासच्या मुसळधार पावसामुळे येथील नेरूळमधील डीवाय पाटील स्टेडियमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या स्टेडियमवर आयपीएल सामने आणि अंडर-17 फिफा विश्वचषक सामन्यांसह इतर क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महालक्ष्मी रेसकोर्स, जेएनपीटी, भायखळा, दादर अशा अनेक परिसरांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. मुंबई आणि परिसरात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस होत आहे. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif