World Boxing C'ships: 'Magnificent' मेरी कोम हिचा वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप सेमीफायनलमध्ये प्रवेश, रेकॉर्ड 8 व्या पदकासाठी स्थान निश्चित
जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 8 पदक जिंकणारी मेरी कॉम ही स्पर्धेच्या इतिहासातील प्रथम (पुरुष/महिला) जागतिक बॉक्सर ठरली आहे.
भारताची चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोम (MC Mary Kom) ने 51 किलो वजनी गटात क्वार्टर फायनल मॅचमध्ये विजयासह जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 'सुपरमॉम' मेरी कोमने कोलंबियाच्या व्हिक्टोरिया वलेन्सियाला पराभूत करून 51 किलो वजनी गटातील सेमीफायनल फेरीत प्रवेश केला. या विजयासह मेरीने भारतासाठी यंदाच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील पहिले पदक पक्क केलं आहे. मेरीचे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप (World Boxing Championship) मधील हे आठवे पदक असेल. सात वेळा चॅम्पियन एमसी मेरी कोमने मंगळवारी थायलंडच्या जुटामास जितपोंगचा 5-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिसऱ्या मानांकित 36 वर्षीय मेरीलापहिल्या फेरीत बाई मिळाले होते.
क्वार्टर फायनलमध्ये मेरीने ऑलिम्पिक पदक विजेता इंग्रीट वलेन्सीयावर 5-0 ने विजय मिळवला. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत 8 पदक जिंकणारी मेरी कॉम ही स्पर्धेच्या इतिहासातील प्रथम (पुरुष/महिला) जागतिक बॉक्सर ठरली आहे. मागील वर्षी नवी दिल्ली येथे 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्यानंतर ती क्यूबानच्या पुरुष फेलिक्स सॅव्हनबरोबर संयुक्तपणे 7 व्या स्थानावर पोहचली होती. 51 किलो वजनी गटात हे मेरीचे पहिले जागतिक चँपियनशिप पदक ठरणार आहे. यंदा भारतीय ऑलिम्पिक पदकविजेता नवीन वजनी गटात टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा कोटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मेरीने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आत्तापर्यंत 6 सुवर्ण पदके आणि एक रौप्यपदक मिळविले आहे.
मेरीचा पुढील सामना शनिवारी तुर्कीच्या द्वितीय मानांकित बुसेनाझ कॅकिरोग्लूशी होणार आहे. मेरीने आपल्या सर्व अनुभवाचा उपयोग व्हॅलेन्शियावर दबाव आणण्यासाठी केला. सध्या सुरू असलेल्या महिला जागतिक स्पर्धेत मेरीने देशासाठी किमान कांस्यपदक पक्क केले आहेत.