Maharashtra Kesari Winner 2020: हर्षवर्धन सदगीर यंदाचा 'महाराष्ट्र केसरी', शैलेश शेळके उपविजेता; पुणे येथील काका पवार तालमीकडे चांदीची गदा

गतवर्षी महाराष्ट्र केसरी विजेता आणि उपविजेता अनुक्रमे बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके हे दोघेही पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपृष्टात आले होते. त्यामुळे लातूर येथल शैलेश शेळके आणि नाशिक येथील हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणाऱ्या अंतिम सामन्यातून कोण ठरणार 'महाराष्ट्र केसरी' याबात उत्सुकता होती.

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Kesari Kusti Winner 2020: काका पवार तालीम (Kaka Pawar Talim) पुणे येथील पठ्ठा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) हा मल्ल यंदाचा ' महाराष्ट्र केसरी' (Maharashtra Kesari) ठरला आहे. हर्षवर्धन सदगीर याने काका पवार या आपल्याच तालमीचा मल्ल शैलेश शेळके (Shailesh Shelke) याला अंतिम कुस्ती सामन्यात आस्मान दाखवत 'महाराष्ट्र केसरी' गदा मिळवली. शैलेश शेळके याच्यावर 3-2 अशा फरकाने आघाडी घेत हर्षवर्धन सदगीर हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला. अंतिम निकाल लागल्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawa) यांच्या हस्ते अत्यंत मानाची समजली जाणारी चांदीची गदा देत हर्षवर्धन यांचा सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेतील अंतिम सामना (Maharashtra Kesari Kusti Final) पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल (Shree Shiv Chhatrapati Krida Sankul, Balewadi) बालेवाडी येथे पार पडला. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यंदा 63 वे वर्ष आहे. गतवर्षी महाराष्ट्र केसरी विजेता आणि उपविजेता अनुक्रमे बाला रफिक शेख आणि उपविजेता अभिजीत कटके हे दोघेही पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपृष्टात आले होते. त्यामुळे लातूर येथल शैलेश शेळके आणि नाशिक येथील हर्षवर्धन सदगीर यांच्यात रंगणाऱ्या अंतिम सामन्यातून कोण ठरणार 'महाराष्ट्र केसरी' याबात उत्सुकता होती.

शैलेश शेळके याच्या रुपात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत लातूराल तब्बल 50 वर्षांनंतर पहिल्यांदाच संधी मिळाली होती. शैलेश शेळके हा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील टाका गावचा रहिवासी आहे. त्यामुळे या दोन्ही मल्लाच्या रुपात उत्तर महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा असाही सामना पाहायला मिळाला. (हेही वाचा, Maharashtra Kesari Kusti 2018: बाला रफिक शेख, महाराष्ट्र केसरी कुस्ती 2018 विजेते, पहा 1961-2018 पर्यंत कोण कोण आहेत विजेते)

अंतिम सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी माती विभागातून लातूरच्या शैलेश शेळके याने सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याच्यावर 11-10 अशा गुणांनी अत्यंत रोमहर्षी विजय मिळवला. तर, नाशिक येथील हर्षवर्धन सदगीर याने गादी (मॅट) विभागात गतवर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटकेला 5-2 अशा फरकाने पराभूत केले. या दोन्ही जय पराजयामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुणे येथील काका पवार या एकाच तालमीच्या दोन मल्लांमध्ये सामना रंगला.

महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम क्षण, पाहा कसा रंगला सामना

तत्पूर्वी माऊली जमदाडे याने गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख याला चितपट केले. त्यानंतर अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी माऊली जमदाडे आणि शैलेश शेळके याच्यात लढत झाली. या लढतीत शैलेश शेळके याने बाजी मारत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बाजी मारली. दुसऱ्या बाजूला उपमहाराष्ट्र केसरी अभिजीत कटके याला पराभूत करत हर्षवर्धन सदीर याने मॅट विभागात आगोदरच आपले स्थान पक्के केल होते. त्यामुळे हा सामना आता एकाच तालमीच्या दोन मल्लांमध्ये होणार हे नक्की झाले होते.