Lionel Messi's Photo on Currency Notes: फुटबॉल विश्वचषकानंतर लिओनेल मेस्सीचा मोठा सन्मान; चलनी नोटांवर छापला जाऊ शकतो फोटो- Reports
कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीने दोन गोल केले, तर फ्रान्सच्या केलियन एमबाप्पेने सामन्यात तीन गोल केले. अतिरिक्त वेळेत 3-3 गोलांसह बरोबरी झाली. यानंतर पेनल्टी शूटआऊटमधून निकाल समोर आला. यावेळी अर्जेंटिनाने शूटआउट 4-2 ने जिंकला.
गेल्या काही दिवस कतारमध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक 2022 संपला आहे. यामध्ये तब्बल 36 वर्षांनंतर अर्जेंटिनाने (Argentina) अखेर फुटबॉलचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले. यासह संघाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचे (Leo Messi) स्वप्नही पूर्ण झाले. अर्जेंटिना संघाने विश्वचषक जिंकला तेव्हापासून लिओनेल मेस्सीची लोकप्रियता वाढली आहे. जगभरातील फुटबॉल चाहत्यांमध्ये त्याच्याबद्दलची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. फिफा विश्वचषक ट्रॉफीसह संघ जेव्हा अर्जेंटिना येथे पोहोचला तेव्हा संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
त्यानंतर मेस्सी त्याच्या गावी पोहोचला तेव्हा तेथेही त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. आता काही रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे की, अर्जेंटिना सरकार मेस्सीचा फोटो देशाच्या चलनी नोटांवर लावू शकते. सेंट्रल बँक ऑफ द रिपब्लिक ऑफ अर्जेंटिना हजार पेसोच्या चलनी नोटेवर मेस्सीची प्रतिमा छापू शकते असे सांगितले जात आहे. आर्थिक वृत्तपत्र एल फायनान्सिएरोच्या (El Financiero) मते, अर्जेंटिनाच्या नियामक बँकेने संघ ला अल्बिसेलेस्टेच्या (La Albiceleste) ऐतिहासिक विश्वचषकाच्या विजयाला चिन्हांकित करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.
अर्जेंटिना सेंट्रल बँकेच्या सदस्यांनी नोटेवर मेस्सीचा फोटो छापण्याचा पर्याय 'मस्करीने' प्रस्तावित केला होता, मात्र लिसांड्रो क्लेरी आणि एडुआर्डो हेकर यांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली. यानंतर 1000 पेसोच्या नोटेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय, नोटेच्या एका बाजूला मेस्सीचा फोटो दिसेल, तर दुसऱ्या बाजूला संघाचे नाव 'ला स्कॅलोनेटा' दिसेल. अर्जेंटिनाने 1978 मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर स्मारक नाणी जारी करण्यात आली होती. (हेही वाचा: Argentina ने FIFA World Cup 2022 चे विजेतेपद जिंकल्यानंतर Lionel Messi झाला भावूक! इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत म्हणाला...)
दरम्यान, कतारमध्ये खेळल्या गेलेल्या फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीने दोन गोल केले, तर फ्रान्सच्या केलियन एमबाप्पेने सामन्यात तीन गोल केले. अतिरिक्त वेळेत 3-3 गोलांसह बरोबरी झाली. यानंतर पेनल्टी शूटआऊटमधून निकाल समोर आला. यावेळी अर्जेंटिनाने शूटआउट 4-2 ने जिंकला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)