Khabib Nurmagomedov ने शेअर केला वडिलांसोबत कुस्ती करतानाचा कधी न पाहिलेला व्हिडिओ, माजी UFC LightWeight फायटरने दिले हृदर्यस्पर्शी कॅप्शन

खाबीबने बुधवारी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये खाबीब आपले स्वर्गीय वडील Abdulmanap यांच्यासोबत कधी न पाहिलेल्या व्हिडिओमध्ये कुश्ती करताना दिसत आहे.

खाबीब नूरमगोमेदोवची वडिलांसह कुस्ती (Photo Credits: Instagram / Khabib Nurmagomedov)

माजी यूएफसी विजेता Khabib Nurmagomedov ने त्याच्या निवृत्तीनंतर यशस्वी एमएमए कारकीर्दीत आपल्या दिवंगत वडिलांचे महत्त्व प्रकट केले. खाबीबने बुधवारी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये खाबीब आपले स्वर्गीय वडील Abdulmanap यांच्यासोबत कधी न पाहिलेल्या व्हिडिओमध्ये कुश्ती करताना दिसत आहे. जुलै महिन्यात कोविड-19 मुळे निधन झालेले अब्दुलमानप हे 'द ईगल'ने लढाऊ क्रीडा जगात प्रवेश केल्याचे मुख्य कारण आहे. खाबीबने व्हिडिओ शेअर करत एक हृदर्यस्पर्शी कॅप्शन दिले, “हा सर्वोत्कृष्ट काळ होता.” यूएफसी 254 मध्ये जस्टिन गेथजे याच्याविरुद्ध निर्विवाद लाइटवेट स्पर्धा जिंकल्यावर खाबीबने निवृत्ती जाहीर केली. खाबीबच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्काच बसला. मुख्य स्पर्धेचा अंतिम सामना 24 ऑक्टोबर, 2020 रोजी अबू धाबी येथे झाला. दरम्यान खाली आपल्या वडिलांसोबत खाबीबच्या कुस्तीचा व्हिडिओ पाहूया. (Ultimate Fighting Championship: Umar याने UFC मध्ये चमकण्याची हिच योग्य वेळ Khabib Nurmagomedov याचा सल्ला)

खबीबने 29-0 च्या विक्रमांसह आपली कारकीर्द संपुष्टात आणली. जस्टिनविरुद्ध फाईटनंतर माजी यूएफसी फायटरने ही त्याची शेवटची लढाई असल्याचे भावुकपणे जाहीर केले. वडिलांशिवाय कुस्ती खेळू शकत नाही, असे खाबीब म्हणाला. त्यामी गेथजेविरूद्ध लढाईसाठी यूएफसीला वचन दिले म्हणूनच त्याने माघार घेतली नव्हती. तसेच, जस्टीनविरुद्ध त्याचा यूएफसी लाइटवेट चॅम्पियनशिप सामना शेवटचा असेल असे त्याने आपल्या आईला वचन दिले होते आणि म्हणून त्याने आपले शब्द पाळला. खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये, खाबीब आणि त्याचे वडील घरात आनंदाने खेळताना दिसत आहे तर त्याचे प्रशिक्षण कार्यसंघ सदस्य हसताना ऐकू येत आहेत. पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

it was the best time. Father❤️ Это было лучшее время.

A post shared by Khabib Nurmagomedov (@khabib_nurmagomedov) on

दरम्यान, खाबीबने आपले उर्वरित आयुष्य आई आणि कुटुंबासमवेत शांततेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. खाबीब मुस्लिम असल्याने आता तो प्रार्थना आणि उपासनेसाठी अधिक वेळ देईल. 2021 मध्ये खाबीबच्या प्रशिक्षकाने 'द इगल'च्या परतण्याचे संकेत दिले असले तरी आपण ईगल अष्टमामध्ये परत पाहू किंवा नाही हे केवळ वेळच सांगेल.