John Cena On Indian Delicacies: WWE चॅम्पीयन जॉन सिन्हा भारतीय पदार्थांच्या प्रेमात, म्हणाला 'ताव मारण्यासाठी पुन्हा यायला आवडेल'

भारतीय पाककृती त्याला विशेष आवडली. ही भावना त्याने झूम व्हिडिओ कॉलवर एएनआयशी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला, भारतीय पदार्थ विशेष रुचकर असतात. त्यांवर ताव मारण्यासाठी मला पुन्हा भारतात यायला आवडेल.

John Cena, Jackpot | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

जॉन सीना (John Cena), 16 वेळा WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता. त्याने जुलै 2024 मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यात (Ambani Wedding) सहभागी होण्यासाठी भारताला भेट दिली. मुंबईतील त्यांच्या लहान मुक्कामादरम्यान, सीनाने भारतीय संस्कृतीत, विशेषत: समृद्ध आणि वैविध्यपूर्ण भारतीय पाककृतींचा (Desi Food) येथेच्छ अस्वाद घेतला. भारतीय पाककृती त्याला विशेष आवडली. ही भावना त्याने झूम व्हिडिओ कॉलवर एएनआयशी बोलताना व्यक्त केली. तो म्हणाला, भारतीय पदार्थ विशेष रुचकर असतात. त्यांवर ताव मारण्यासाठी मला पुन्हा भारतात यायला आवडेल.

भारतीय अन्नपदार्थ विशेष

जॉन सीना याने वृत्तसंस्था एएनायशीबोलताना सांगितले की, अंबानींच्या लग्नात पाककृतीचा वाटा महत्त्वाचा होता. पण त्यांनी भारतीय खाद्यपदार्थ आणि भारतीय स्ट्रीट फूड देखील खूप चांगले होते. भारतातील जेवण विलक्षण होते. भारतातील माझा मुक्काम अल्प होता.. भारतीय पदार्थ पाहणे आणि त्यांचा आस्वाद घेण्यासाठी मला पुन्हा भारतात परत जायला आवडेल. पदार्थांमधील मसाल्याचा वापक माझ्यासाठी खास होता, असे जॉन सिना म्हणाला. (हेही वाचा, John Cena Announces Retirement: जॉन सीनाची WWE मधून निवृत्तीची घोषणा, 2025 मध्ये शेवटच्या वेळी दिसणार रिंगमध्ये)

अंबानींच्या विवाह सोहळ्यात जॉन सीना आकर्षण

अनंत आणि राधिकाच्या लग्नात WWE चॅम्पीन जॉन सीना पूर्ण देसी पोषाखात उपस्थित होता. त्याने पारंपारिक शेरवानी घातली होती. डब्ल्युडब्ल्युच्या रिंगमध्ये स्वत:ला सिद्ध करणाऱ्या या रेसलरने अंबानीच्या लग्नात रेड कार्पेटवर मोठे आकर्षण मिळवले. त्याची छबी टीपण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीचीही घाई पाहायला मिळत होती. अनेकांसाठी तो खास आकर्षण राहिला.

सीनाचा नवा चित्रपट

दरम्यान, जॉन सीना प्राइम व्हिडिओच्या आगामी 'जॅकपॉट' चित्रपटात काम करणार आहे. ज्यामध्ये Awkwafina देखील आहे. लॉस एंजेलिसमध्ये 2030 मध्ये निश्चित झालेला हा चित्रपट लॉटरी जिंकणारी संघर्ष करणारी अभिनेत्री केटी (ऑक्वाफिना) भोवती फिरतो. तथापि, ट्विस्ट असा आहे की कॅलिफोर्नियाचा कायदा कोणालाही परिणामांशिवाय बक्षिसाच्या रकमेवर दावा करण्यासाठी सूर्यास्तानंतर लॉटरी विजेत्याचा खून करण्याची परवानगी देतो. Cena एक हौशी लॉटरी प्रोटेक्शन एजंटच्या भूमिकेत केटीला जगण्यासाठी मदत करतो, त्याच्या प्रोत्साहन म्हणून बक्षिसाच्या रकमेत कपात केली जाते.केटीला जिवंत राहण्यास मदत करणे ही हौशी लॉटरी प्रोटेक्शन एजंट (सीना) आहे, ज्याला ती जिवंत राहिल्यास रोख रक्कम मिळते. Awkwafina सोबत काम करण्याचा अनुभव शेअर करताना Cena म्हणाला, "Awkwafina अप्रतिम आहे, आणि तिची कॉमेडीची शैली अप्रतिम आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif