ISSF विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधरी याचा ‘सुवर्ण’ वेध, 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले
या स्पर्धेतील रशियाच्या आर्टेम चेरनोसोव्हने कांस्य पदक पटकावले. 19 वर्षीय ऑलिम्पियन सौरभ पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल पात्रता टप्प्यात एकूण 584 गुणांसह तिसरा होता.
भारताचा दिग्गज नेमबाज सौरभ चौधरी (Saurabh Chaudhary) याने कैरो येथील ISSF विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील सुवर्ण पदक सामन्यात जर्मनीच्या माइकल श्वॉल्डचा पराभव करून भारताच्या पदरी पदक पाडले. तसेच या स्पर्धेतील कांस्य रशियाच्या (Russia) आर्टेम चेरनोसोव्हने जिंकले, ज्याच्या देशाचा ध्वज युक्रेनमध्ये चालू असलेल्या संघर्षात (Russia-Ukraine Conflict) सहभागी झाल्यामुळे काढून टाकण्यात आला होता.