सुनील छेत्रीचा फूटबॉलमध्ये भीमपराक्रम! लिओनेल मेसीला मागे पछाडत केले दुसरे सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल

ताजिकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल करत सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

एकीकडे आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने ताजिकिस्तान (Tajikistan) विरोधात झालेल्या सामन्यात दोन गोल करत सामन्यात अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रविवारी अहमदाबाद (Ahmedabad) येथे ताजिकिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात दोन महत्त्वपूर्ण गोल करत सर्वात जास्त गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान या सामन्यात भारताला 2-4नं पराभव स्विकारावा लागला. छेत्रीने पहिला गोल चौथ्या मिनिटाला केला. तर, दुसरा गोल 41व्या मिनिटाला केला.

दरम्यान पहिला गोल करताच छेत्रीने अर्जेंटिना (Argentina) चा कर्णधार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) याला मागे टाकले. मेसीने 136 आंतरराष्ट्रीय सामन्यात 68 गोल केले आहेत. तर, छेत्रीने केवळ 109 सामन्यात 70 गोल केले आहेत. पोर्तुगाल (Portugal) चा क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याच्या नावावर 158 सामन्यात 88 गोल आहेत.

भारताचा दुसरा सामना 13 जुलै रोजी दक्षिण कोरिया (South Korea) विरोधात होणार आहे. दुसरीकडे, ताजिकिस्तानने भारताला तब्बल तिसऱ्यांदा पराभूत केले. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 5 सामने खेळले गेले आहेत. यातील केवळ एकाच सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे, तर एक सामना रद्द झाला आहे.