Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 5 व्या दिवशी भारताची उत्कृष्ट कामगिरी; घोडेस्वारीत कांस्यपदक जिंकून Anush Agarwalla ने रचला इतिहास
घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत अनुषने कांस्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games) पाचव्या दिवशीही भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने एकापाठोपाठ एक पदके जिंकली. यानंतर, 28 सप्टेंबर रोजी वुशूमध्ये भारताने पहिले पदक जिंकले. रोशिबिना देवीने भारतासाठी रौप्य पदक जिंकले. यानंतर अनुष अग्रवालाने (Anush Agarwalla) घोडेस्वारीतील (Horse Riding) ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. अनुषने भारतासाठी ऐतिहासिक कांस्यपदक मिळवलं. अनुष आणि त्याचा घोडा इट्रोने 73.030 गुणांसह तिसरे स्थान पटकावले. वैयक्तिक ड्रेसेजमधील भारताचे हे पहिलेच पदक आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत एकूण 25 पदके जिंकली आहेत. ज्यात 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे.
अनुष अग्रवालाने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 25 वे पदक मिळवून दिले. घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत अनुषने कांस्यपदक जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी ड्रेसेज वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. तर मलेशियाने 75.780 गुणांसह सुवर्णपदक तर हाँगकाँगने 73.450 गुणांसह रौप्यपदक जिंकले. (हेही वाचा - Hangzhou Asian Games 2023: भारतीय नेमबाजांची प्रशंसनीय कामगिरी, पुरुष संघाने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये जिंकले सुवर्णपदक)
आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीतील भारताचे हे 14 वे पदक होते. अश्वारूढांनी ड्रेसेज संघासह हँगझोऊमध्ये 4 सुवर्णपदके जिंकली आहेत. अनुष अग्रवालाने सांघिक अंतिम फेरीतही चमकदार कामगिरी केली आणि संघाचा शेवटचा रायडर म्हणून शानदार प्रयत्न करून भारताच्या पदकाच्या आशा वाढवल्या.