राष्ट्रकूल स्पर्धेतून बाहेर पडण्याचा भारताचा इशारा, नेमबाजी आणि तिरंदाजी काढल्याने तीव्र शब्दांत केली निंदा

2022 मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजी काढल्याने भारताने आपली नाराजी व्यक्त करत स्पर्धेवर बहिष्कार घालण्याचा इशारा ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे.

(Image Credit: Twitter)

2022 मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहॅम (Birmingham) येथे होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेवर (Commonwealth Games) बहिष्कार घालण्याचा इशारा ऑलिम्पिक संघट (Indian Olympic Association) नेचे सचिव राजीव मेहता यांनी दिला आहे. 2022 च्या स्पर्धेतून नेमबाजी (Shooting) आणि तिरंदाजी (Archery) काढल्याने भारताने आपली नाराजी व्यक्त केली आहे. मेहता म्हणाले, 'भारताला नेहमीच चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. पदक मिळवण्यासाठी नेमबाजी हे सर्वात मोठे स्त्रोत आहे. भारतात या खेळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. आम्हाला माहितीय की, एखादा निर्णय मागे घेणे अवघड आहे. परंतु, पुढील महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धासंबंधी सदस्यांची (कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन) बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतोय, हे पाहावे लागले.

कॉमनवेल्थ फेडरेशन (Commonwealth Federation) ने गुरुवारी झालेल्या बैठकीत 2022 च्या बर्मिंगहॅम स्पर्धेतून नेमबाजी आणि तिरंदाजी ला वगळण्याचा निर्णय घेतला होता. शिवाय महिला क्रिकेट (Women's Cricket), बीच व्हॉलीबॉल (Beach Volleyball) आणि पॅरा टेबलटेनिस (Para Table-Tennis) या तीन नव्या खेळांना या स्पर्धेत स्थान देण्याचे बोलले जात आहे.

नेमबाजी खेळ बाहेर ठेवल्यामुळे भारताला मोठा धक्का बसणार आहे. 2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला 66 पैकी 16 पदके नेमबाजीतून मिळाली होती.