Hockey World Cup 2023: भारत 47 वर्षांपासून विश्वचषकाची वाट पाहतोय, जाणून घ्या भारतीय पुरुष हॉकी विश्वचषकाचे संपुर्ण वेळापत्रक
2023 पुरुष हॉकी विश्वचषक 13 जानेवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 29 जानेवारीला खेळवला जाईल.
Hockey World Cup 2023: पुरुष हॉकी विश्वचषक 13 जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि त्याचे यजमानपद भारताकडे असेल. हॉकी इंडियाने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या समन्वयाने या जागतिक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जवळपास अर्धशतकापासून विश्वचषक ट्रॉफीची वाट पाहणारा भारत आता स्पेनविरुद्धच्या लढतीला सुरुवात करणार आहे. 2023 पुरुष हॉकी विश्वचषक 13 जानेवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 29 जानेवारीला खेळवला जाईल. या स्पर्धेचे सर्व सामने ओडिशामध्ये खेळवले जातील. घरच्या मैदानावर होणाऱ्या विश्वचषकाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या विश्वचषकात भारत घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना आहे. भारताला साखळी टप्प्यात एकूण 3 सामने खेळायचे आहेत. विश्वचषक सुरू होण्यासाठी 10 दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत. चला तर मग बघूया भारतीय संघाचे वेळापत्रक...
विश्वचषकासाठी भारतीय संघ
भारत: पीआर श्रीजेश, कृष्णा पाठक, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास (उपकर्णधार), नीलम संजीप, मनप्रीत सिंह, हार्दिक सिंह, नीलकांत शर्मा, शमशेर सिंह, विवेक सागर प्रसाद, आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, अभिषेक, सुखजित सिंग, राजकुमार पाल, जुगराज सिंह
किती संघ स्पर्धेत सहभागी होणार?
भारतात होणाऱ्या या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार असून, त्यांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांना त्यांच्या गटात एकूण 3 सामने खेळायचे आहेत. (हे देखील वाचा: IND vs SL 2nd T20: टीम इंडियाला पुण्यातील नाणेफेकवर अवलंबून राहाणे ठरेल धोकादायक, पहा येथील आकेवारी)
पहा चार गट
ग्रुप A - ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका
ग्रुप B - बेल्जियम, जर्मनी, कोरिया आणि जपान
ग्रुप C - नेदरलँड, न्यूझीलंड, मलेशिया आणि चिली.
ग्रुप D - भारत, इंग्लंड, स्पेन आणि वेल्स
भारताने शेवटचे विजेतेपद कधी जिंकले?
भारत 47 वर्षांपासून वर्ल्ड कप ट्रॉफीची वाट पाहत आहे. भारतीय संघाने शेवटचा हॉकी विश्वचषक ट्रॉफी 1975 मध्ये क्वालालंपूर, मलेशिया येथे जिंकली होती. यानंतर भारतीय संघाला या जागतिक स्पर्धेत एकही ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली नाही. टीम इंडियाने गेल्या वेळी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवून वर्ल्ड कप जिंकला होता. अशा स्थितीत भारत यंदा विश्वचषक ट्रॉफी जिंकेल अशी अपेक्षा आहे.
भारतातील सर्व सामन्यांचे वेळापत्रक
भारत विरुद्ध स्पेन - 13 जानेवारी 2023 संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध इंग्लंड - 15 जानेवारी 2023 संध्याकाळी 7 वाजता
भारत विरुद्ध वेल्स - 19 जानेवारी 2023 संध्याकाळी 7 वाजता